esakal | VIDEO : 3D मॅनचा धमाका; बोल्ट, बुमराहलाही सोडलं नाही

बोलून बातमी शोधा

ambati rayudu
VIDEO : 3D मॅनचा धमाका; बोल्ट, बुमराहलाही सोडलं नाही
sakal_logo
By
सुशांत जाधव

दिल्लीच्या मैदानात चेन्नई सुपर किंग्ज (CSK) आणि मुंबई इंडियन्स (MI) रंगलेल्या महा मुकाबल्यामध्ये रोहित शर्माने टॉस जिंकून पहिल्यांदा बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला. चेन्नई सुपर किंग्जचा सलामीवीर स्वस्तात माघारी परतल्यानंतर मुंबई इंडियन्सच्या कर्णधाराचा निर्णय योग्य असल्याचे वाटत होते. पण मोईन अली आणि फाफ ड्युप्लेसीसने मुंबईची गणिते बिघडवली. दोघांनी अर्धशतकी खेळी करुन दुसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी करुन डाव सावरला. त्यानंतर मध्यफळीत अंबाती रायडूने आपल्या भात्यातील फटकेबाजी दाखवून दिली. अवघ्या 20 चेंडूत त्याने अर्धशतकाला गवसणी घातली. त्याने 27 चेंडूत नाबाद 72 धावांची खेळी केली. ट्रेट बोल्ट, बुमराह, धवल कुलकर्णी आणि राहुल चाहर यांच्या गोलंदाजीवर त्याने चेंडूला आसमान दाखवले.

हेही वाचा: कोहलीने कवडी मोलात काढलं; त्याला धोनीनं 24 कॅरेट सोनं बनवलं

अंबाती रायडूने 20 चेंडूत केलेले अर्धशतक झळकावले. यंदाच्या हंगामातील सर्वात जलद अर्धशतक झळकवणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो दुसऱ्या स्थानावर पोहचला आहे. दिल्ली कॅपिटल्सचा सलामीवीर पृथ्वी शॉ या यादीत टॉपला आहे. त्याने अहमदाबादच्या मैदानात केकेआर विरुद्धच्या सामन्यात 18 चेंडूत अर्धशतक झळकावले होते. पंजाब किंग्जच्या दीपक हुड्डाने 20 चेंडूत अर्धशतक केले होते. त्याने राजस्थान विरुद्धच्या सामन्यात तुफान फटकेबाजी केली होती. आंद्रे रसेल या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे. वानखेडेच्या मैदानात चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध त्याने 21 चेंडूत अर्धशतक झळकावले होते. 2019 च्या वर्ल्ड कपमध्ये मध्यफळीतील फलंदाज म्हणून रायडूकडे पाहिले जात होते. मात्र मोक्याच्या क्षणी त्याला डच्चू देण्यात आला होता. यावेळी थ्रीडी गॉगल्स घालून मॅच पाहणार असल्याचे त्याचे ट्विट चांगले व्हायरल झाले होते. आपल्या भात्यात आजही फटके आहेत, हेच 3D मॅनने दाखवून दिले आहे.

हेही वाचा: 'मुंबई इंडियन्स'च्या जर्सीमधली नवी 'मिस्ट्री गर्ल' कोण?

मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने चेन्नई विरुद्धच्या सामन्यात टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय घेतला. ऋतूराज गायकवाड आणि फाफ ड्युप्लेसीस यांनी संघाच्या डावाला सुरुवात केली. ऋतूराज 4 धावा करुन पहिल्याच षटकात माघारी फिरला. त्यानंतर फाफ ड्युप्लेसीसने 50 आणि मोईन अलीने 58 धावांची खेळी केली. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 108 धावांची भागीदारी केली. त्यानंतर रायडू आणि रविंद्र जडेजा यांनी नाहाज 102 धावांची भागीदारी रचत चेन्नईची धावसंख्या 4 बाद 218 धावांपर्यंत पोहचवली.