esakal | ही प्रत्येक वेळी साथ देते, रसेलनं दारुच्या खंब्यासह शेअर केला फोटो

बोलून बातमी शोधा

andre russell
ही प्रत्येक वेळी साथ देते, रसेलनं दारुच्या खंब्यासह शेअर केला फोटो
sakal_logo
By
टीम ई सकाळ

कोलकाता नाईट रायडर्स (KKR) चा स्टार ऑल राउंडर आंद्रे रसेल नावाला साजेसा खेळ करताना दिसत नाही. मसल पावर रसेल मोठ्या फटकेबाजीसाठी ओळखला जातो. परंतु त्याच्या भात्यातून फटकेबाजी पाहायला मिळालेली नाही. एका मॅचमध्ये त्याने गोलंदाजीत धार दाखवली तर एका मॅटमध्ये फटकेबाजीही केली. पण यात सातत्याचा अभाव स्पष्टपणे जाणवला. चेन्नई सुपर किंग्ज विरुद्धच्या सामन्यात त्याने धमाकेदार अर्धशतक झळकावले होते. 32 वर्षीय रसेलने यंदाच्या हंगामात 19.66 च्या सरासरीने धावा केल्या आहेत.

img

andre russell

राजस्थान रॉयल्स (RR) विरुद्धच्या सामन्यातील अपयशानंतर रसेलने इन्स्टाग्राम अकाउंटवरुन एक फोटो शेअर केलाय. यात तो दारुची बाटली हातात घेऊन बसल्याचे दिसते. कधी कधी ठिक नसूनही सर्व काही ठिक सुरु असते. या कॅप्शनसह त्याने दारुच्या बाटलीसह फोटो शेअर केलाय. इन्स्टा स्टोरीला ठेवलेल्या फोटोमध्ये त्याने दारुच्या बाटलीच्या इमोजीसह ही प्रत्येक वेळी साथ देते, असेही लिहिले आहे.

हेही वाचा: VIDEO : विल्यमसनने शार्दुलला दाखवल्या 'चांदण्या'

मागील काही वर्षांपासून रसेल केकेआर संघाचा भाग आहे. त्याने अनेक सामन्यात संघाला यश मिळवून दिले आहे. मात्र सध्याच्या घडीला तो लयीत खेळताना दिसत नाही. त्याचा फॉर्म संघाचे टेन्शन वाढवणारा आहे. आयपीएलमधील 80 सामन्यात रसेलने 28.68 च्या सरासरीने 1635 धावा केल्या आहेत. 88 ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे. त्याने 179.67 च्या स्ट्राइक रेटने धावा केल्या आहेत. त्याच्या खात्यात 68 विकेटही आहेत. यात त्याने एकदा चार तर एकदा पाच विकेट घेण्याचा पराक्रम केला आहे.