esakal | VIDEO : विल्यमसनने शार्दुलला दाखवल्या 'चांदण्या'

बोलून बातमी शोधा

VIDEO : विल्यमसनने शार्दुलला दाखवल्या 'चांदण्या'
VIDEO : विल्यमसनने शार्दुलला दाखवल्या 'चांदण्या'
sakal_logo
By
टीम ई सकाळ

IPL 2021, SRH vs CSK Match : दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर रंगलेल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार आणि मध्य फळीतील मनिष पांड्येनं संघाचा डाव सावरला. या दोघांनी 106 धावांची भागीदारी करुन चेन्नई सुपर किंग्जच्या गोलंदाजांचा खरपूस समाचार घेतला. त्यानंतर मैदानात उतरलेल्या केन विल्यमसनने तुफानी फटकेबाजी केल्याचे पाहायला मिळाले. केन विल्यमसनने शार्दुल ठाकूरच्या एका ओव्हरमध्ये तब्बल 20 धावा कुटल्या.

हेही वाचा: IPL Record : जे कुणाला जमलं नाही ते वॉर्नरनं करुन दाखवलं

19 व्या षटकात महेंद्र सिंग धोनीने शार्दुलच्या हाती चेंडू सोपवला. स्ट्राईकवर असलेल्या केदार जाधवने सिंगल काढून देत केन विल्यमसनला स्ट्राईक दिले. दुसऱ्या चेंडूवर केनने एक खणखणीत चौकार ठोकला. हा फक्त ट्रेलर असल्याचे दाखवून देत तिसऱ्या चेंडूवर षटकार आणि पुन्हा सलग दोन बाउंड्री मारत केन विल्यमसनने शार्दुलची लाईन लेंथ बिघडवली. या षटकात सनरायझर्स हैदराबादच्या खात्यात 3 चौकार आणि एका षटकारासह सिंगलच्या रुपात दोन धावा मिळाल्या. केन विल्यमसन याने या षटकात ज्या तोऱ्यात फलंदाजी केली ती बघण्याजोगी होती.

शार्दुल ठाकूरला या सामन्यात नावाला साजेशी गोलंदाजी करता आली नाही. चार षटकांच्या कोट्यात त्याने तब्बल 44 धावा खर्च केल्या यात एका वाईडच्या स्वरुपात एका अवांतर धावेचा समावेश आहे. त्याला एकही विकेट मिळाली नाही. शार्दुल ठाकूरनं आतापर्यंत स्पर्धेत 6 सामने खेळले असून यात त्याला केवळ चार विकेट मिळाल्या आहेत.