esakal | IPL 2021, KKR VS CSK: दोन रन आउटनं चेन्नई झाले टेन्शन फ्री

बोलून बातमी शोधा

CSK

IPL 2021, KKR VS CSK: दोन रन आउटनं चेन्नई झाले टेन्शन फ्री

sakal_logo
By
टीम-ई-सकाळ

IPL 2021 KKR VS CSK 15th Match : मुंबईतील वानखेडेच्या मैदानात चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) आणि कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) यांच्यात सामना झाला. कोलकाताचा कर्णधार इयॉन मॉर्गन याने टॉस जिंकून पहिल्यांदा फिल्डिंगचा निर्णय घेतला होता. शेवटच्या ओव्हरपर्यंत रंगतदार झालेल्या 200 पारच्या लढाईत अखेर चेन्नई सुपर किंग्जने बाजी मारली. रसेल आणि दिनेश कार्तिकने कोलकाताचा डाव सावरल्यानंतर अखेरच्या टप्प्यात पॅट कमिन्सने केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर सामना रंगतदार स्थितीत पोहचला होता. 19 व्या ओव्हरमधील शेवटच्या चेंडूवर वरुण चक्रवर्ती रन आउट झाला तर शेवटच्या ओव्हरमध्ये प्रसिद्ध कृष्णाला रन आउट करत चेन्नईने 18 धावांनी विजय नोंदवला. पॅट कमिन्सने 34 चेंडूत 4 चौकार आणि 6 षटकाराच्या मदतीने नाबाद 66 धावांची खेळी केली. याशिवाय आंद्रे रसेलने 22 चेंडूत 3 चौकार आणि 6 षटकाराच्या मदतीने 54 धावा कुटल्या. दिनेश कार्तिकने 24 चेंडूत 40 धावा करुन संघासाठी उपयुक्त योगदान दिले. चेन्नईकडून दीपक चाहरने सर्वाधिक 4 तर एनिग्डीने 3 विकेट घेतल्या. सॅम कुरेन याने मोक्याच्या क्षणी रसेलची घतलेली विकेट चेन्नईच्या फायद्याची ठरली.

हेही वाचा: IPL 2021: सेनापती जिंकला, पण संघ हरला! राहुलने कोहली-रोहितला टाकले मागे

कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार इयॉन मॉर्गन याने टॉस जिंकून पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. ऋतूराज गायकवाड आणि फाफ ड्युप्लेसीस या जोडीने त्याचा हा निर्णय चुकीचा ठरवला. दोघांनी पहिल्या विकेटसाठी 115 धावांची पार्टनरशिप केली. 42 बॉलमध्ये 6 फोर आणि 4 सिक्सर मारुन ऋतूराज 64 धावांवर बाद झाला. चक्रवर्तीने कोलकाता संघाला पहिली विकेट मिळवून दिली. मोईन अलीने 12 बॉलमध्ये 2 फोर आणि 2 सिक्सरसह 25 रन्स केल्या. धोनी 8 बॉलमध्ये 17 धावा करुन बाद झाला. फाफ ड्युप्लेसीसच्या 60 बॉलमधील नाबाद 95 रन्सच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्जने 20 ओव्हरमध्ये 220 रन्स केल्या होत्या.

हेही वाचा: IPL 2021 : 4 कोटींचा हिरो ठरतोय झिरो

या टार्गेटचा पाठलाग करताना कोलकाताच्या इनिंगची सुरुवात खराब झाली. शुभमन गिलली खातेही उघडता आले नाही. नितिश राणा 9(12), इयॉन मॉर्गन 7 (7), सुनील नरेन 4(3), राहुल त्रिपाठी 8(9) रन्स करुन स्वस्तात माघारी परतले. संघाच्या धावफलकावर 5 बाद 31 धावा असताना दिनेश कार्तिक आणि मसल पॉवर रसेलने डाव सावरला. दोघांनी सहाव्या विकेटसाठी 81 रन्सची भागीदारी केली. 22 बॉलमध्ये 54 धावा करणाऱ्या रसेलला सॅम कुरेनने आउट केले. दिनेश कार्तिकच्या रुपात संघाला सातवा धक्का बसला. त्याने 24 बॉलमध्ये 40 रन्स केल्या. 34 चेंडूत 66 रन्स करणाऱ्या कमिन्स शेवटपर्यंत नाबाद राहिला. पण त्याला संघाला विजय मिळवून देता आले नाही. दीपक चाहरने सर्वाधिक 4 तर एनिग्डीने 3 विकेट घेतल्या अखेरच्या दोन षटकात वरुण चक्रवर्ती आणि प्रसिद्ध कृष्णा रन आउट झाले आणि चेन्नई सुपर किंग्जने 18 धावांनी सामना जिंकला.

 • 202-10 : प्रसिद्ध कृष्णाला रन आउट करत चेन्नईने सामना जिंकला

 • 200-9 : वरुण चक्रवर्ती मोक्याच्या क्षणी रन आउट, पॅट कमिन्सने दोन धावांसाठी कॉल केल्यानंतर नकार देणं पडलं महागात

 • 176-8 : कमलेश नागरकोटीला एनिग्डीने खातेही उघडू दिले नाही

 • 146-7 : एनिग्डीने दिनेश कार्तिकच्या खेळीला लावला ब्रेक, त्याने 24 चेंडूत 40 धावांची खेळी केली

 • 112-6 : सॅम कुरेनने चेन्नईला दिला मोठा दिलासा, रसेलला केल बोल्ड

 • मसल पॉवर रसेलची फटकेबाजी, 2 चेंडूत पूर्ण केले अर्धशतक

 • 31-5 : एनिग्डीला पहिले यश, राहुल त्रिपाठी 8 धावा करुन बाद

 • 31-4 : दीपक चाहरचा कहर, सुनील नरेनही 4 धावांवर तंबूत

 • 27-3 : कर्णधार इयॉन मॉर्गनही 7 चेंडूत 7 धावा करुन बाद, चाहरची तिसरी विकेट

 • 17-2 : सलामीवीर नितीश राणाही 9 धावांची भर घालून परतला, चाहरला मिळाली विकेट

 • 1-1 : दीपक चाहरने शुभमन गिलला खातेही उघडू दिले नाही

 • फाफ ड्युप्लेसीसने 60 चेंडूत नाबाद 95 धावांची खेळी केली

img

Faf du Plessis

 • 201-3 : धोनीच्या रुपात चेन्नईला तिसरा धक्का, त्याने 8 चेंडूत 2 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने केल्या 17 धावा

 • 165-2 : मोईन अलीच्या फटकेबाजीला सुनील नरेन याने लावला ब्रेक, त्याने 12 चेंडूत 25 धावा केल्या

 • 115-1 : ऋतूराज गायडवाड 42 चेंडूत 6 चौकार आणि 4 षटकार खेचून परतला

फाफ ड्युप्लेसीस आणि ऋतूराजनं संघाला दमदार सुरुवात करुन दिली, दोघांची पहिल्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी

Kolkata Knight Riders (Playing XI): नितीश राणा, शुभमन गिल, राहुल त्रिपाठी, इयॉन मॉर्गन (कर्णधार), दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), सुनील नरेन, आंद्रे रसेल, पॅट कमिन्स, कमलेश नागरकोटी, वरुण चक्रवर्ती, प्रसिद्ध कृष्णा

Chennai Super Kings (Playing XI): ऋतूराज गायकवाड, फाफ ड्युप्लेसीस, मोईन अली, सुरेश रैना, अंबाती रायडू, रविंद्र जडेजा, एमएस धोनी (यष्टीरक्षक/ कर्णधार), सॅम कुरेन, शार्दुल ठाकूर, लुंगी एनिग्डी, दीपक चाहर.