esakal | IPL 2021: सेनापती जिंकला, पण संघ हरला! राहुलने कोहली-रोहितला टाकले मागे

बोलून बातमी शोधा

KL Rahul
IPL 2021: सेनापती जिंकला, पण संघ हरला! राहुलने कोहली-रोहितला टाकले मागे
sakal_logo
By
टीम-ई-सकाळ

IPL 2021 : सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) विरुद्धच्या सामन्यात पंजाब किंग्जचा कर्णधार केएल राहुल (KL Rahul) स्वस्तात माघारी फिरला. त्याच्या भात्यातून फटकेबाजी पाहायला मिळाली नसली तरी त्याने एक मोठा विक्रम आपल्या नावे केला आहे. टी-20 क्रिकेटमध्ये संघाचे नेतृत्व करताना त्याने 5000 धावांचा टप्पा पार केलाय. केवळ 143 डावात मैलाचा पल्ला गाठताना त्याने विराट कोहली (Virat Kohli) आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) यांना मागे टाकले आहे.

सनरायझर्स हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात केएल राहुल केवळ 4 धावांची भर घालून परतला. या चार धावांसह टी-20 मध्ये नेतृत्व करताना केएल राहुलच्या नावे 143 डावात 5003 धावा झाल्या आहेत. 42 ची सरासरी आणि 138 च्या स्ट्राईक रेटने त्याने या धावा केल्या आहेत. यात 4 शतके आणि 41 अर्धशतकांचा समावेश आहे. आंतरराष्ट्रीय टी-20 आणि लीग मॅचेसमध्ये केएल राहुलने शतक झळकावले आहे.

हेही वाचा: IPL 2021: SRH वाल्यांनी नेटकऱ्यांच ऐकलं; पांड्येजीच्या जागी केदार भाऊला संधी

विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यात अद्याप एकही शतक झळकावले नाही. यावरुन राहुलची कामगिरी किती विराट आहे, याची कल्पना येते. संघाचे नेतृत्व करताना राहुलची कामगिरी एक नंबर असली तरी त्याचा संघाला फायदा होताना दिसलेला नाही. युएईमध्ये रंगलेल्या आयपीएलच्या हंगामात राहुलने ऑरेंज कॅप पटकावली होती. मात्र त्यांना प्ले ऑफमध्येही स्थान मिळवता आले नाही. यंदाच्या हंगामातही त्याच्या नेतृत्वाखालील पंजाब किंग्ज संघाला दमदार कामगिरी करता आलेली नाही. 4 पैकी तीन सामने गमावल्यामुळे गुणतालिकेत त्याचा संघ तळाला आहे.

हेही वाचा: IPL 2021: हिटमॅनचा सिक्सर पाहून नताशाही झाली शॉक; व्हिडिओ व्हायरल

ओव्हर ऑल टी20 मधील सर्वात जलदगतीने 5 हजार धावांचा टप्पा पार करण्याचा विक्रम हा वेस्ट इंडिजचा धमाकेदार फलंदाज क्रिस गेलच्या नावे आहे. त्याने 132 डावात हा टप्पा पार केला होता. केएल राहुलने ऑस्ट्रेलियाच्या शॉन मार्शला मागे टाकले आहे. मार्शने 144 डावात 5000 धावा पूर्ण केल्या होत्या. क्रिकेट जगतात सर्वात जलद 5000 धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत लोकेश राहुल दुसऱ्या क्रमांकावर आहे. विराट कोहलीने यासाठी 167 वेळा बॅटिंग केली होती. तर रोहित शर्माला 188 डाव खेळावे लागले होते.