esakal | CSK विरुद्ध MI ने चिटिंग केली; हे मुंबईचं स्पिरीट का?

बोलून बातमी शोधा

MI vs CSK
CSK विरुद्ध MI ने चिटिंग केली; हे मुंबईचं स्पिरीट का?
sakal_logo
By
टीम-ई-सकाळ

ऑस्ट्रेलियाचा माजी फिरकीपटू ब्रॅड हॉजने मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यातील रंगतदार सामन्यासंदर्भात एक ट्विट केले आहे. दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर रंगलेल्या सामन्यात पोलार्डच्या धमाकेदार खेळीच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्जला शह दिला. या सामन्यात शेवटच्या चेंडूवर दोन धावांची गरज असताना पोलार्डने दुहेरी धाव काढत मुंबईच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. पण हा विजय मिळवण्यासाठी मुंबईच्या गड्यांनी अखिलाडूवृत्तीचे दर्शन घडवून दिले, अशा आशयाचे ट्विट ब्रॅड हॉजने केले आहे.

चेन्नई सुपर किंग्ज विरुद्धच्या सामन्यात रोहित शर्माने टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. चेन्नई सुपर किंग्जने पहिल्यांदा बॅटिंग करताना 218 धावा करुन मुंबईसमोर 2019 धावांचे चॅलेंज ठेवले. फाफ ड्युप्लेसीस आणि मोईन अलीच्या अर्धशतकी खेळीनंतर अंबाती रायडूने चेन्नईकडून धमाकेदार बॅटिंग केली. या धावांचा पाठलाग करताना क्विंटन डिकॉक आणि रोहित शर्माने चांगली सुरुवात करुन दिली. या जोडीने पहिल्या विकेटसाठी 71 धावांची पार्टनरशिप केली. ही दोघ परतल्यानंतर सामन्याला कलाटणी देण्याची जबाबदारी ही पोलार्डवर येऊन परतली. कृणाल पांड्या आणि पोलार्डने डाव सावरल्यानंतर मोक्याच्या क्षणी कृणाल 32 (23) आणि हार्दिक पांड्या 16 (7) माघारी फिरले. जेम्स नीशम हजेरी लावून परतल्यानंतर पोलार्डने आश्वासक खेळी केली.

हेही वाचा: पोलार्ड तुसी ग्रेट हो! CSK च्या तावडीतून MI ची सुखरुप सुटका

मुंबई इंडियन्सला अखेरच्या षटकात 16 धावांची गरज होती. पोलार्ड स्ट्राईकवर होता. एनिग्डीने टाकलेल्या पहिल्या चेंडूवर पोलार्डने चेंडू टोलावला. पण सिंगर रन्स घेणं त्यानं टाळले. याच कारण दुसऱ्या बाजूला धवल कुलकर्णी नुकताच मैदानात आला होता. दुसऱ्या आणि तिसऱ्या चेंडूवर खणखणीत चौकार लगावत पोलार्डने सामना 3 चेंडूत 8 धावा अशा परिस्थितीत आणला. एनिग्डीने चौथा चेंडू पुन्हा निर्धाव टाकला. 2 चेंडूत 8 धावांची गरज असताना पाचव्या चेंडूवर पोलार्डने षटकार खेचला. एका चेंडूत दोन धावांची गरज असताना पोलार्डने धवल कुलकर्णीच्या साथीने दोन धावा पळून काढत संघाला विजय मिळवून दिला.

हेही वाचा: IPL 2021:पोलार्डने तुफान फटकेबाजीसह नोंदवली फास्टर फिफ्टी!

ब्रॅड हॉजने रंगतदार झालेल्या सामन्यातील शेवटच्या क्षणाचा एक फोटो शेअर केलाय. यात एनिग्डी बॉलिंग टाकत असताना धवल कुलकर्णी बॉल रिलीज होण्यापूर्वीच रन काढण्यासाठी धावल्याचे दिसते. यापूर्वी अनेकांनी नॉन स्ट्राईकरला असलेल्या खेळाडूकडून होणाऱ्या या कृत्यावर आक्षेप नोंदवला होता. ब्रॅड हॉजने मुंबई इंडियन्सच्या खेळाडूचे हे कृत्य अखिलाडू वृत्तीचे आहे, असे म्हटले आहे. चेन्नई विरुद्धच्या सामन्यात मुंबई इंडियन्सने चिटिंग करुन सामना जिंकला, अशा प्रतिक्रिया उमटताना दिसताहेत.