esakal | VIDEO : ड्रेसिंग रुमध्ये मॅच विनर पोलार्डचं जंगी स्वागत

बोलून बातमी शोधा

VIDEO : ड्रेसिंग रुमध्ये मॅच विनर पोलार्डचं जंगी स्वागत
VIDEO : ड्रेसिंग रुमध्ये मॅच विनर पोलार्डचं जंगी स्वागत
sakal_logo
By
टीम ई सकाळ

दिल्लीच्या अरुण जेटली मैदानात शनिवारी कायरन पोलार्ड नावाच वादळं उठल्याचे अनुभवायला मिळाले. सलामीच्या जोडीने सेटअप दिल्यानंतर पोलार्डने विजयी बॅकअप देत मुंबईच्या चौथ्या विजयात सिंहाचा वाटा उचलला. मॅच जिंकल्यानंतर मुंबई इंडियन्सच्या गड्यांनी मैदानात पळत येत पोलार्डला गराडा घालून विजयाचे सेलिब्रेशन केल्याचे पाहायला मिळाले. हा सीन सर्वांनीच पाहिला. त्यानंतर ड्रेसिंग रुममधील त्याचे जंगी स्वागतही करण्यात आले.

हेही वाचा: IPL 2021:पोलार्डने तुफान फटकेबाजीसह नोंदवली फास्टर फिफ्टी!

शेवटच्या चेंडूपर्यंत रंगतदार झालेल्या सामन्यात कायरन पोलार्डने मुंबईला विजयी मिळवून दिला. त्याने 34 चेंडूत 87 धावांची नाबाद खेळी केली. चौकाराच्या तुलनेत त्याच्या भात्यातून षटकारांची बरसात अधिक झाल्याचे पाहायला मिळाले. त्याने चक्क 8 षटकार खेचले. संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केल्यानंतर कायरन पोलार्डने परमेश्वराचे आभार मानल्याचे पाहायला मिळाले. टीम सहकाऱ्यांनी धावत पळत जाऊन त्याच्या मॅच विनिंग खेळीला दाद दिली. मुंबई इंडियन्सच्या ट्विटर अकाउंटवरुन ड्रेसिंग रुममधील एक व्हिडिओ शेअर करण्यात आलाय. यात कायरन पॉलर्डच्या जंगी स्वागत केल्याचे पाहायला मिळते. बॅटिंग कोट महिला जयवर्धने, सुर्यकुमार यादव, पीयुष चावला यासह इतर मंडळींनी पोलार्डचे अभिनंद केल्याचे व्हिडिओमध्ये दिसून येते.

हेही वाचा: CSK विरुद्ध MI ने चिटिंग केली; हे मुंबईचं स्पिरीट का?

आमचे गोलंदाज अचूक टप्प्यावर गोलंदाजी करत होते. तरीही त्यांना धावा रोखण्यात अपयश आले. त्यामुळे मी स्लोअर बॉलिंग करण्यावर भर दिला. यात मी यशस्वीही ठरलो. फलंदाजीवेळी वाइड यॉर्करचा मारा केला जाणार याची मला कल्पना होती. यासाठी मी तयार होतो, असे मॅच विनर पोलार्डने सांगितले होते. बुमराह, बोल्ट आणि अन्य भरवशाचे गोलंदाज अपयशी ठरल्यानंतर पोलार्डने दोन विकेट घेतल्या होत्या.