esakal | IPL 2021 : पोलार्डच्या कृतीने मुंबई इंडियन्स बदनाम

बोलून बातमी शोधा

Pollard
IPL 2021 : पोलार्डच्या कृतीने मुंबई इंडियन्स बदनाम
sakal_logo
By
टीम-ई-सकाळ

आयपीएलच्या 14 व्या हंगामात पाच वेळा चॅम्पियन राहिलेला मुंबई इंडियन्सचा संघ संघर्ष करताना दिसत आहे. स्पर्धेतील 17 वा सामना चेन्नईच्या मैदानात मुंबई इंडियन्स (MI) आणि पंजाब किंग्ज (PBKS) यांच्यातील सामना रंगतदार होण्याची अपेक्षा होती. पण या सामन्यात क्रिकेट चाहत्यांची घोर निराशा झाली. केएल राहुल (KL Rahul) च्या नेतृत्वाखालील पंजाब किंग्जे मुंबई इंडियन्सला 9 विकेट्सनी पराभूत केले. मुंबईच्या पराभवाशिवाय या सामन्यात पोलार्डने केलेल्या कृत्याची सोशल मीडियावर जारोदार चर्चा सुरु आहे.

क्रिडा क्षेत्रातील इतर बातम्यांसाठी येथे क्लिक करा

पंजाबचा जलदगती गोलंदाज मोहम्मद शमी (Mohammed Shami) च्या गोलंदाजीवेळी पोलार्ड नॉन स्ट्राईकवर असताना एक किस्सा घडला. शमीच्या हातून बॉल रिलीज होण्यापूर्वीच पोलार्डने (Kieron Pollard) क्रिज सोडल्याचे पाहायला मिळाले. सामन्यातील अखेरच्या षटकात हा प्रकार घडला. व्हिडिओ कॅमेऱ्यात हा क्षण कैद झाला असून हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हेही वाचा: IPL 2021: पहिली फिफ्टी लेकीसाठी; 'विराट' सेलिब्रेशन पाहिले का? (VIDEO)

पोलार्डने केलेल्या प्रकारानंतर मांकडिंग (Mankading) मुद्यावर चर्चेला सुरुवात झालीये. कॉमेट्री पॅनलमध्ये असलेल्या मुरली कार्तिकनेही पोलार्डच्या या कृतीवर नाराजी व्यक्त केलीये. हा प्रकार थांबवण्यासाठी कठोर नियमावलीची गरज असल्याचे त्याने म्हटले आहे. पोलार्डने केलेली कृती ही अखिलाडूवृत्तीचे दर्शन घडवणारी आहे, अशी भावना सोशल मीडियावरुन नेटकरी व्यक्त करत आहेत. पोलार्डची ही कृती मुंबई इंडियन्ससला विनाकारण बदनाम करणारी अशीच आहे, अशा प्रतिक्रियाही उमटत आहे. फेअर प्ले अवार्डमधील संघाच्या गुणावर याचा परिणाम होऊ शकतो.

यंदाच्या स्पर्धेत नॉन स्ट्रायकरने बॉल रिलीज होण्यापूर्वी क्रिज सोडण्याची ही पहिली घटना नाही. चेन्नई सुपर किंग्ज (CSK) आणि राजस्थान रॉयल्स (RR) यांच्यातील सामन्यात सीएसकेचा ऑल राउंडर ड्वेन ब्रावो (Dwayne Bravo) मुस्तफिझूर रहमाननच्या गोलंदाजीत असाच काहीसा प्रकार केला होता. त्यावेळी कॉमेंट्री करणाऱ्या हर्षा भोगले यांनी ही कृती अयोग्य असल्याचे म्हटले आहे.