esakal | MI vs PBKS : कट नसताना दिलं आउट; रोहितची जीभ घसरली? (VIDEO)

बोलून बातमी शोधा

Rohit Sharma
MI vs PBKS : कट नसताना दिलं आउट; रोहितची जीभ घसरली? (VIDEO)
sakal_logo
By
टीम ई सकाळ

PBKS vs MI: पंजाब विरुद्धच्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) संघाचा डाव सावरला. त्याने आयपीएलच्या करियरमधील 40 वी फिफ्टी झळकावली. डावातील पहिल्याच षटकात अंपायरने त्याला आउट दिले होते. मोईसेस हेनरिक्सचा लेग स्टम्पच्या बाहेर जाणाऱ्या चेंडूवर जोरदार अपील झाली. अंपायर्सनी बोट वर करत त्याला बाद दिली. चेंडूने बॅटची कड घेतलेली नाही हे रोहितला माहित होते. पंचाच्या या निर्णयावर तो चांगलाच खवळला. वेळ न घालवता त्याने रिव्ह्यूव्ह घेतला आणि तो नाबाद असल्याचे स्पष्ट झाले.

हेही वाचा: IPL 2021: पहिली फिफ्टी लेकीसाठी; 'विराट' सेलिब्रेशन पाहिले का? (VIDEO)

रोहित अंपायरच्या या निर्णयावर नाराज झाल्याचे पाहायला मिळाले. तो अंपायकडे बघून पुटपूटतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यानंतर रोहितने 52 चेंडूत 63 धावांची खेळी करत मुंबई इंडियन्सच्या डावावा आकार दिला. त्याच्या या खेळीत 5 चौकार आणि 2 षटकारांचा समावेश होता. शमीने त्याची विकेट घेतली. अंपायरने दिलेल्या निर्णायनंतर त्याच्या तोंडून काही आक्षेपार्ह शब्द निघल्याचे वाटते. व्हिडिओत शब्दांचा उच्चार स्पष्ट नसला तरी कुठे तरी रोहितची जीभ घसरली असेच वाटते.

या सामन्यातील अर्धशतकासह रोहित शर्माने आयपीएलमध्ये ओपनर म्हणून 1500 धावा करण्याचा विक्रमही आपल्या नावे केला. याशिवाय संघाचे नेतृत्व करताना त्याच्या भात्यातून 23 वी फिफ्टी निघाली. त्याने या विक्रमासह धोनीला मागे टाकले. धोनीने आयपीएलमध्ये कॅप्टन्सी करताना 22 वेळा 50 + धावा केल्या आहेत. IPL मध्ये संघाचे नेतृत्व करताना सर्वाधिक वेळा 50 किंवा त्याच्यापेक्षा अधिक धावा करण्याचा विक्रम विराट कोहलीच्या नावे आहे. त्याने 38 वेळा अशी कामगिरी केलीये. या यादीत गंभीर दुसऱ्या स्थानावर आहे. त्याने कॅप्टन्सी करताना 31 वेळा 50 + धावा केल्या आहेत. या अर्धशतकासह रोहित शर्मा ऑरेंज कॅपच्या यादीत दुसऱ्या स्थानावर पोहचलाय.