
IPL 2021 : 6 देशातील खेळाडू BCCI चं टेन्शन वाढवणार?
IPL 2021 : 14 व्या हंगामातील स्थगित झालेल्या आयपीएल स्पर्धेच्या उर्वरित सामन्याच्या नियोजनात एका पाठोपाठ एक अडचणी निर्माण होत आहेत. इंग्लंडच्या संघातील (England Cricket) खेळाडू स्पर्धेतील उर्वरित सामन्यात खेळणार नसल्याच्या वृत्ताने बीसीसीआयची (BCCI) धडधड वाढली असताना आता आणखी काही देशांचे खेळाडू स्पर्धेत सहभागी होणार नसल्याचे चर्चा सुरु झाली आहे. 6 देशांतील तब्बल 53 खेळाडू स्पर्धेत सहभागी होणार नसल्याची बातमी समोर येत आहे. जर ही बातमी खरी ठरली तर बीसीसीआयचे टेन्शन निश्चितच वाढेल.
हेही वाचा: IPL 2021 : उर्वरित मॅचसाठी इंग्लंडमधून वाजली धोक्याची घंटा
आयपीएल स्पर्धा घेण्यासाठी भारतीय क्रिकेट मंडळाकडे सप्टेंबरमधील पहिल्या दोन आठवड्यापासून ऑक्टोबरच्या पहिल्या दोन आठवड्यांचा स्लॉट उपलब्ध आहे. या कालावधीत अनेक संघाचे आंतरराष्ट्रीय सामने नियोजित आहेत. त्यामुळे परदेशी खेळाडू स्पर्धेसाठी उपलब्ध असणे मुश्कील दिसत आहे. इंग्लंड क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष एश्ले जाइल्स यांनी यापूर्वीच यासंदर्भात बीसीसीआयला सावध केले होते. इंग्लंडचा संघ बांगलादेश आणि पाकिस्तान दौऱ्यावर जाणार असून हा कार्यक्रम नियोजित वेळेनुसार झाला तर इंग्लिश खेळाडू आयपीएल स्पर्धेत खेळणे मुश्किल असेल, असे त्यांनी सांगितले आहे.
हेही वाचा: IPL च्या उर्वरित सामन्यासाठी BCCI ला परदेशातून आली ऑफर
आयपीएलमध्ये 7 देशातील 62 खेळाडू सहभागी आहेत. जर 6 देशांतील खेळाडू आयपीएलसाठी उपलब्ध नसतील तर बीसीसीआयला उर्वरित सामन्यांचे नियोजन करणे कठीण होऊन बसेल. महत्त्वपूर्ण 53 खेळाडूंपैकी 14 खेळाडू हे इंग्लंड तर 9 खेळाडू हे दक्षिण आफ्रिकेचे आहेत. न्यूझीलंडचे 8, ऑस्ट्रेलियाचे 17 आणि बांगलादेशच्या 2 तर अफगाणिस्तानच्या 3 खेळाडूंही आयपीएलमध्ये खेळतात. वेस्ट इंडिजचे 9 खेळाडू आयपीएलशी सलग्नित असून त्यांचा या कालावधीत कोणताच दौरा नसल्यामुळे हे खेळाडू स्पर्धेसाठी उपलब्ध असतील.
IPL 2021 Not only england players more 6 Country might not take part in rescheduled ipl 14 season
Web Title: Ipl 2021 Not Only England Players More 6 Country Might Not Take Part In Rescheduled Ipl 14
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..