esakal | 4 4 4 4 4 4 पृथ्वीचा शो, परत तो बॉलर दिसलाच नाही (VIDEO)

बोलून बातमी शोधा

Prithvi Shaw
4 4 4 4 4 4 पृथ्वीचा शो, परत तो बॉलर दिसलाच नाही (VIDEO)
sakal_logo
By
सुशांत जाधव

Delhi vs Kolkata, 25th Match : अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर पृथ्वी शॉचा शो पाहायला मिळाला. कोलकाता नाईट रायडर्सने (Kolkata Knight Riders ) पहिल्यांदा बॅटिंग करत दिल्ली कॅपिटल्ससमोर (Delhi Capitals) 155 धावांचे आव्हान ठवले. या धावांचा पाठलाग करण्यासाठी पथ्वी शॉ (Prithvi Shaw) आणि शिखर धवन (Shikhar Dhawan) जोडीने दिल्लीच्या डावाला सुरुवात केली. युवा शिवम मावी वर्सेस पृथ्वी शॉ असा सामना पहिल्याच ओव्हमध्ये रंगला. यात पृथ्वीनं बाजी मारली.

हेही वाचा: IPL 2021 : क्विंटन डिकॉकची नाबाद फिफ्टी; MI ने मारली बाजी

शिवम मावीने पहिला चेंडू वाईड टाकला. दिल्ली कॅपिटल्सच्या संघाचे खाते या अवांतर धावेनं उघडल्यानंतर पृथ्वीचा शो पाहायला मिळाला. त्याने पहिल्याच षटकात सलग 6 चौकार खेचून शिवम मावीची चांगलीच धुलाई केली. हा फक्त ट्रेलर होता. पिक्चर तर या ओव्हरनंतर सुरु झाला. पृथ्वी शॉने अवघ्या 18 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. दिल्ली कॅपिटल्सकडून आयपीएलमध्ये सर्वात जलद अर्धशतक झळकवणारा तो दुसरा फलंदाज ठरला. यापूर्वी 2016 च्या हंगामात क्रिस मॉरिसने दिल्लीकडून खेळताना गुजरात विरुद्धच्या सामन्यात 17 चेंडूत अर्धशतक झळकावले होते. 2019 च्या हंगामात रिषभ पंतने मुंबई विरुद्ध 18 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले होते. अहमदाबादच्या मैदानात पृथ्वीने पंतची बरोबरी केली.