esakal | IPL 2021: आर आर! संघावर आली लोनवर प्लेयर मागण्याची वेळ!
sakal

बोलून बातमी शोधा

Rajasthan Royals

IPL 2021: आर आर! संघावर आली लोनवर प्लेयर मागण्याची वेळ!

sakal_logo
By
टीम ई सकाळ

देशात एका बाजुला कोरोनाचे संकट दिवसागणिक वाढत असताना दुसऱ्या बाजूला आयपीएल स्पर्धा सुरु आहे. स्पर्धा नियोजित वेळापत्रकानुसार सुरु असताना काही खेळाडूंनी कोरोनाच्या धास्तीमुळे स्पर्धेतून माघार घेतली आहे. याचा सर्वात मोठा फटका राजस्थान रॉयल्सच्या (Rajasthan Royals) संघाला बसलाय. बेन स्टोक्स (Ben Stokes) दुखापतीमुळे संघाबाहेर गेलाय. तर जोफ्रा आर्चर दुखापतीमुळे स्पर्धेत सहभागी होणार नाही, हे स्पष्ट झालाय. हे दोन खेळाडू आउट झाल्यानंतर लियाम लिविंगस्टोन आणि अँड्रू टाय या दोघांनी स्पर्धा सोडून मायदेशी परतण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे राजस्थानच्या ताफ्यात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

क्रीडा जगतातील अन्य बातम्यांसाठी येथे क्लिक करा

पीटीआयच्या वृत्तानुसार, राजस्थान रॉयल्सने इतर फ्रेंचाइझी संघांना लोनवर खेळाडू देण्यासंदर्भात पत्र लिहिले आहे. लोन विंडो लीगच्या साखळी सामन्यापर्यंत खुली असते. त्यामुळे इतर फ्रेंचायझी संघ यावर काय निर्णय घेणार? राजस्थानला कोणता संघ लोनवर प्लेयर देण्यास तयारी दाखवणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

आयपीएलच्या नियमावलीनुसार, साखळी फेरीत लोन विंडोच्या माध्यमातून एखाद्या संघातील खेळाडून लोनच्या रुपात घेता येतो. ज्या खेळाडूने दोन पेक्षा अधिक सामने खेळले नसतील त्या प्लेयरला लोनच्या माध्यमातून दुसऱ्या ताफ्यातून खेळता येते. राजस्थानच्या संघ आता या नियमाचा वापर करण्याच्या तयारीत दिसतोय. आपल्या समस्या त्यांनी पत्राच्या माध्यमातून इतर फ्रेंचायझींसोबत शेअर केल्या आहेत.

हेही वाचा: IPL 2021 : ऑसी खेळाडूंसंदर्भात PM म्हणाले; तुमचं तुम्ही बघा!

आयपीएलच्या यंदाच्या हंगामात पाच पैकी तीन सामन्यात पराभव स्विकारलेल्या राजस्थान रॉयल्सच्या संघाच्या नावे दोन विजयाची नोंद आहे. खेळाडू स्पर्धेतून आउट होण्याशिवाय संघातील खेळाडूंचा फॉर्म हा देखील त्यांच्यासाठी चिंतेचा विषय आहे. जोस बटलरच्या कामगिरीत सातत्याचा अभाव दिसतोय. राजस्थान रॉयल्सचा स्पर्धेतील पुढचा सामना हा दमदार कामगिरी करत असलेल्या दिल्ली कॅपिटल्ससोबत रंगणार आहे. लोन विंडोचा नियम त्यांना फायदेशीर ठरणार का? हे येणारा काळच ठरेल.

loading image