IPL 2021: BCCI चा रिव्ह्यू इंग्लंडच्या पारड्यात पडणार?

अनिश्चित काळासाठी स्थगित झालेल्या स्पर्धेसंदर्भात या महिन्याच्या अखेरीस मोठी बातमी समोर येऊ शकते.
bcci
bccie sakal
Summary

अनिश्चित काळासाठी स्थगित झालेल्या स्पर्धेसंदर्भात या महिन्याच्या अखेरीस मोठी बातमी समोर येऊ शकते.

देशातील कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावमुळे (Corona Pandemic India) यंदाच्या 14 व्या हंगामातील आयपीएल स्पर्धा (IPL 2021) स्थगित करण्याची नामुष्की बीसीसीआयवर (BCCI)ओढावली. स्पर्धा स्थगित झाली असली तरी ती रद्द झालेली नाही, असे सांगत बीसीसीआये उर्वरित सामने खेळवून स्पर्धा पूर्ण करण्याचा विश्वास व्यक्त केला. स्पर्धेतील 31 सामने नक्की कोणत्या ठिकाणी होणार? आणि त्याचा मुहूर्त कसा काढयचा हा प्रश्न बीसीसीआयसमोर असेल. अनिश्चित काळासाठी स्थगित झालेल्या स्पर्धेसंदर्भात या महिन्याच्या अखेरीस मोठी बातमी समोर येऊ शकते. 29 मे रोजी बीसीसीआयची सर्वसाधारण बैठक होणार आहे. या बैठकीत आयपीएल स्पर्धेतील उर्वरित सामन्यांसदर्भात रिव्ह्यू घेण्यात येणार आहे. या बैठकीत उर्वरित सामने इंग्लंडमध्ये घेण्यासंदर्भात महत्त्वाचा निर्णय घेतला जाऊ शकतो. (ipl 2021 remaining matches may be held in england BCCI take call upcoming meeting)

bcci
शाब्बास एबी! तुझ्यासारखा विचार कुणी केला नसता

आयपीएलच्या उर्वरित सामन्याचे यजमानपद भुषवण्यासाठी इंग्लंड प्रयत्नशील असून बीसीसीआयची पहिली पसंती त्यांनाच आहे. आयपीएल संदर्भात काही मोठा निर्णय झाला तर बीसीसीआय आणि इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्ड भारत आणि इंग्लंड यांच्यातील नियोजित पाच सामन्यांच्या मालिकेतही बदल करण्यास राजी होऊ शकतात, अशी चर्चा आहे.

bcci
कोहलीची श्रवणथीच्या आईवरील उपचारासाठी लाख मोलाची मदत

बीसीसीआय आणि इंग्लंड क्रिकेट बोर्ड पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेचे वेळापत्रकात बदल करण्यासंदर्भात चर्चा सुरु असल्याचे वृत्त प्रसारमाध्यमातून समोर येत आहे. चर्चेचा नेमका विषय समोर आला नसला तरी आयपीएलचे यजमानपद भूषविण्यासाठी इंग्लंड बोर्ड बीसीसीआयसोबत फायद्याचा सौदा करु शकते.

आयपीएलच्या उर्वरित सामन्यासाठी इंग्लंडची निवड करणे बीसीसीआयसाठी अधिक खर्चिक असेल. यापरिस्थितीत युएई आणि श्रीलंका हे दोन बॅकअप प्लॅन बीसीसीआयकडे असतील. आयपीएल स्पर्धेतील उर्वरित सामन्याचा इंग्लंडमधील खर्च हितधारकांच्या फायद्याचा नसेल, तर हा प्लॅन फ्लॉप होऊ शकतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com