esakal | IPL 2021 : विसल पोडू! CSK नं RCB ला दाखवला पहिला पराभव

बोलून बातमी शोधा

RCB vs CSL
  • 74-1 : 25 चेंडूत 33 धावा करुन ऋतूराज गायकवा बाद, चहलने संघाला मिळवून दिले पहिले यश

IPL 2021 : विसल पोडू! CSK नं RCB ला दाखवला पहिला पराभव
sakal_logo
By
टीम ई सकाळ

IPL 2021, RCB vs CSK 19 th Match : रविंद्र जडेजाच्या अष्टपैलू खेळीच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्जने मुंबईच्या वानखेडेच्या मैदानात विजयी चौकार खेचला. धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नईने किंग कोहलीच्या नेतृत्वाखालील बंगळुरुचा विजय रथ रोखला. फलंदाजीत फटकेबाजी करणाऱ्या रविंद्र जडेडाने गोलंदाजीतही कमाल दाखवली. 4 षटकांच्या कोट्यात जडेजाने 13 धावा खर्च करुन 3 विकेट घेतल्या. यात वॉशिंग्टन सुंदर 7(11), ग्लॅन मॅक्सवेल 22 (15) आणि एबी डिव्हिलियर्सच्या विकेटचा समावेश होता. धोनीच्या संघाने विराट सेनेसमोर 192 धावांचे लक्ष्य ठेवले होते.

या धावांचा पाठलाग करण्यासाठी विराट कोहली आणि पदिक्कल यांनी डावाला सुरुवात केली. पदिक्कलने पहिल्यापासून आक्रमक पवित्रा घेतला. पहिल्या तीन षटकात बंगळुरुने 40 पेक्षा अधिक धावा केल्या होत्या. सॅम कुरेन याने विराट कोहलीला धोनीकरवी झेलबाद करत बंगळुरच्या संघाला पहिला धक्का दिला. त्यानंतर शार्दुल ठाकूरने देवदत्त पदिक्कलही चालता झाला. शार्दुल ठाकूरने त्याची विकेट घेतली. मॅक्सवेलच्या 22 आणि कायले जेमिनसन 16 वगळता अन्य कोणत्याही फलंदाजाला दुहेरी आकडा गाठता आला नाही.

हेही वाचा: RCB vs CSK : जडेजाने केली युवी-गेलची बरोबरी; एका ओव्हरमध्ये 36 धावांचा धमाका (VIDEO)

अखेरच्या षटकात अष्टपैलू रविंद्र जडेजाने केलेल्या फटकाबाजीच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्जने रॉयल चॅलेंजर्ससमोर 192 धावांचे टार्गेट ठेवले होते. फाफ ड्युप्लेसीसचे अर्धशतक 50 (41) आणि ऋतूराज गायकवाड 33 (33) यांच्या दमदार भागीदारीनंत रैना 24 आणि अंबाती रायडू 14 धावा करुन परतले. त्यानंतर सामन्याची सूत्रे जडेजाने आपल्या हाती घेतली. हर्षल पटेलच्या अखेरच्या षटकात त्याने 5 षटकार आणि 1 चौकार खेचला. ओव्हरमध्ये तब्बल 37 धावा चेन्नईच्या खात्यात जमा झाल्या. जडेजाने 28 चेंडूत 4 चौकार आणि 5 षटकाराच्या मदतीने 62 धावांची नाबाद खेळी करत संघाच्या धावफलकावर 4 बाद 191 धावा लावल्या.

टॉस जिंकून धोनीने घेतली बॅटिंग