esakal | IPL Record : जे कुणाला जमलं नाही ते वॉर्नरनं करुन दाखवलं

बोलून बातमी शोधा

Warner
IPL Record : जे कुणाला जमलं नाही ते वॉर्नरनं करुन दाखवलं
sakal_logo
By
टीम-ई-सकाळ

Chennai vs Hyderabad, 23rd Match : राजधानी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्ज (CSK) विरुद्धच्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा (SRH) कर्णधार डेविड वॉर्नरने टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. सॅम कुरेनने त्याचा गेम प्लॅन अडचणीत आणला. सलामीवीर बेयरस्टोला त्याने अवघ्या 7 धावांवर तंबूत धाडले. धावफलकावर केवळ 22 धावा असताना सनरायझर्स हैदराबादने आपली पहिली विकेट गमावली. ऑरेंज आर्मीचा कॅप्टन वॉर्नरने मनिष पांड्येच्या साथीनं डावाला आकार दिला. दोघांनी शतकी भागीदारी करुन चेन्नई सुपर किंग्जच्या गोलंदाजांचे खांदे पाडले.

हेही वाचा: IPL 2021 : महिला चॅलेंज गेम फिस्कटणार

15 व्या आणि 16 व्या ओव्हरमध्ये वॉर्नरने कमालीचा रेकॉर्ड आपल्या नावे केला. 15 व्या ओव्हरमध्ये एनिग्डीच्या चौथ्या चेंडूवर दुहेरी धाव घेत टी-20 मध्ये 10000 धावांचा टप्पा त्याने सर केला. याच ओव्हरमधील पुढच्या चेंडूवर सिक्सर मारुन त्याने आयपीएलमध्ये 200 सिक्सरचा पल्लाही गाठला. इथेच तो थांबला नाही. रविंद्र जडेजा घेऊन आलेल्या 16 व्या षटकातील पाचव्या बॉलवर त्याने सिक्सर मारत आयपीएलमधील पन्नासावी फिफ्टी झळकावली.

हेही वाचा: ब्रो तू टेस्ट खेळ IPL नको, बॉलिवूड स्टारचा पंतवर निशाणा

आयपीएलच्या इतिहासात 50 फिफ्टी झळकवणारा तो पहिला फलंदाज आहे. 148 सामन्यातील 148 डावात त्याने हा पराक्रम आपल्या नावे केला. आयपीएलमध्ये त्याच्या नावे 5447 + धावा जमा झाल्या आहेत. डेविड वॉर्नरने चेन्नई विरुद्धच्या सामन्यात 55 बॉलमध्ये 3 फोर आणि 2 सिक्सर लगावत 57 रन्स केल्या. लुंगी एनिग्डीने त्याची विकेट घेतली.