esakal | विराटसाठी कोचशी पंगा; कॅप्टन्सीनंतर वॉर्नरला संघातूनही डच्चू

बोलून बातमी शोधा

David Warner
विराटसाठी कोचशी पंगा; कॅप्टन्सीनंतर वॉर्नरला संघातूनही डच्चू
sakal_logo
By
टीम ई सकाळ

आयपीएलच्या 14 व्या हंगामात हैदराबादच्या सूर्याला पराभवाचं ग्रहण लागल्याचे दिसते. सातत्याने पदरी पडलेल्या निराशेनंतर सनरायझर्स हैदराबादच्या संघात नेतृत्वाची खांदे पालट झाल्याचे पाहायला मिळाले. डेविड वॉर्नरऐवजी संघाची धूरा आता केन विल्यमसन याच्याकडे देण्यात आली आहे. या धक्क्यातून तो सावरत नाही तोवर त्याला आणखी एक झटका बसलाय. राजस्थान रॉयल्सच्या संघाविरुद्ध त्याला प्लेइंग इलेव्हनमध्येही स्थान मिळालेले नाही.

सनरायझर्स हैदराबादचे कोच टॉम मूडी म्हणाले की, राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या सामन्यापूर्वी आम्हाला कठोर निर्णय घ्यावा लागला. कोणाला तरी एकाला बाहेर बसवायचे होते. डेविड वॉर्नरच तो खेळाडू आहे. 6 सामन्यातील एका विजयासह पाँइट टेबलमध्ये तळाला आहे. हैदराबाद संघाच्या ढिसाळ कामगिरीनंतर डेविड वॉर्नरला कर्णधारपदाला मुकावे लागले आहे. त्याच्याशिवाय आता त्याला संघातही स्थान मिळाले नाही.

हेही वाचा: पोलार्ड तुसी ग्रेट हो! CSK च्या तावडीतून MI ची सुखरुप सुटका

विल्यमसन याने यापूर्वी सनरायझर्स हैदाराबाद संघाचे नेतृत्व केले आहे. 2018 आणि 2019 हंगामात तो कॅप्टन्सी करताना दिसला होता. केन विल्यमसनच्या नेतृत्वाखाली सनरायझर्स हैदराबादने 26 मॅचेस खेळल्या असून यातील 14 सामन्यात विजय आणि 11 सामन्यात संघाला पराभवाचा सामना करावा लागला.

वॉर्नर- मूडी यांच्यात वाद

पीटीआयच्या वृत्तानुसार, टॉम मूडी आणि डेविड वॉर्नर यांच्यात अजिबात पटत नाही. दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या सामन्यात मनिष पांड्येला खाली बसून विराट सिंहला संघात स्थान दिले होते. या निर्णयानंतर दोघांमधील मतभेद आणखी टोकाला गेले. पांड्येला बाहेर बसवण्याचा निर्णय कठोर होतो, असे वॉर्नरने म्हटले होते. प्लेइंग इलेव्हनसंदर्भात टॉम मूडी आणि वॉर्नर यांच्यात कधीच एकमत होत नाही, हेच त्याला हटवण्याचे कारण मानले जात आहे.