esakal | सुपर ओव्हरमध्ये पंतचा रिस्की शॉट; जिगरबाज खेळीनं दिल्ली जिंकली

बोलून बातमी शोधा

SRH VS DC
सुपर ओव्हरमध्ये पंतचा रिस्की शॉट; जिगरबाज खेळीनं दिल्ली जिंकली!
sakal_logo
By
टीम ई-सकाळ

दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात शेवटपर्यंत रंगतदार झालेल्या सामन्याचा निकाल सुपर ओव्हरमध्ये लागला. दिल्ली कॅपिटल्सने पहिल्यांदा बॅटिंग करताना4 बाद 159 धावा केल्या होत्या. त्यांनी सनरायझर्स हैदराबादसमोर 160 धावांचे आव्हान ठेवले. चेस करताना हैदराबादच्या संघाने निर्धारित 20 षटकात 7 गड्यांच्या मोबदल्यात 159 पर्यंत मजल मारली. सुपर ओव्हमध्ये गेलेल्या सामन्यात नियमानुसार पहिल्यांदा बॅटिंग करताना डेविड वॉर्नर आणि केन विलियम्सने दिल्लीच्या संघासमोक 7 धावांचे टार्गेट दिले होते. दिल्लीचा कर्णधार पंत आणि शिखर धवन यांनी हे टार्गेट पार कण्याची जबाबदारी पार पाडली. सुपर ओव्हमध्ये दिल्लीने अक्षर पटेल तर सनरायझर्स हैदराबादने राशीद खानला निवडल्याचे पाहायला मिळाले.

हेही वाचा: विराट IPL खेळतोय आणि तिकडे बाबर त्याचा रेकॉर्ड मोडतोय

दिल्ली कॅपिटल्सने पहिल्यांदा बॅटिंग करताना 4 बाद 159 धावा केल्या होत्या. सलामीवीर पृथ्वी शॉने 39 चेंडूत 53 धावा कुटल्या. आपल्या इनिंगमध्ये त्याने 7 चौकार आणि एक षटकार लगावला. रन आउटच्या स्वरुपात त्याने विकेट फेकली. धवन 26 चेंडूत 28 धावा करुन परतला. पंतने 27 चेंडूत 37 धावा केल्या. स्मिथने 3 चौकार आणि 1 षटाकार खेचत नाबाद 34 धावा केल्या. सिद्धार्थ कौलच्या दोन आणि राशीद खानला एक विकेट मिळाली.

या धावांचा पाठलाग करताना सनरायझर्स हैदराबादची सुरुवात खराब झाली. धावफलकावर 28 धावा असताना कर्णधार वॉर्नर माघारी फिरला.. जॉनी बेयरस्टोने 18 चेंडूत 38 धावांची खेळी केली. विराट सिंग 4, केदार जाधव 9. अभिषेक शर्मा 5. राशीद खान 0 आणि विजय शंकर 8 धावा करुन माघारी फिरल्यानंतर केन विल्यम्सन 51 चेंडूत नाबाद 66 धावा आणि जगदिशा सुचितने 6 चेंडूत 14 धावा करत संघाच्या विजयाच्या आशा पल्लवित केल्या. पण त्यांना 7 बाद 159 धावांपर्यंतच मजल मारता आली.