IPL 2022 Auction: मेगा लिलाव लांबणीवर; जाणून घ्या त्यामागचं कारण

जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात मेगा लिलाव प्रक्रिया पार पाडण्यासाठी बीसीसीआय प्रयत्नशील आहे. पण...
ipl auction 2022
ipl auction 2022 File Photo

IPL 2022 Auction : बीसीसीआय (BCCI) आणि आयपीएल (IPL) गव्हर्निंग काउंसिल जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात मेगा लिलाव प्रक्रिया पार पाडण्यासाठी प्रयत्नशील होते. पण यासंदर्भात आता बीसीसीआयचे प्लॅनिंग कोलमडणार असल्याचे दिसते. बीसीसीआयच्या (BCCI) एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, मेगा लिलाव प्रक्रिया जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्याच्या आधी होणं मुश्किल आहे. इनसाइड स्‍पोर्ट्सच्या वृत्तानुसार, बीसीसीआयने फ्रेंचायझींना जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात मेगा लिलाव प्रक्रिया होणार असल्याची माहिती दिली आहे.

पण या नियोजनात बदल होण्याची शक्यता आहे. अहमदाबाद फ्रेंचायझीसंबंधित मुद्यावर अंतिम स्वरुप देण्याच्या कारणास्तव लिलाव प्रक्रिया जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत पुढे ढकलावा लागू शकतो. बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, आम्ही अद्याप अहमदाबाद फ्रेंचायझीच्या सीव्हीसी ऑनरशिपसंदर्भात विशेष समितीच्या निर्णयाची वाट पाहत आहोत. त्यांचा निर्णय आल्याशिवाय मेगा लिलावाच्या तारखा स्पष्ट होऊ शकत नाही, असे अधिकाऱ्याने म्हटले आहे.

ipl auction 2022
Video : बेन स्टोक्सचा अफलातून कॅच; व्हिडिओ व्हायरल

नव्या फ्रेंचायझींना खेळाडू निवडण्याची विंडो

आगामी आयपीएल स्पर्धेत लखनऊ आणि अहमदबाद हे दोन नवे संघ सहभागी होणार आहेत. लिलावापूर्वी या नव्या संघाना तीन खेळाडू निवडण्यासाठी विंडो उपलब्ध करुन द्यावी लागेल. ही प्रक्रिया जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मेगा लिलावाच्या तारखा काढणे शक्य नाही. त्यामुळे आयपीएलच्या मेगा लिलावाची प्रतिक्षा आणखी लांबणीवर पडणार आहे.

ipl auction 2022
साक्षीनं शेअर केली धोनीसोबतच्या पार्टनरशिपची अनटोल्ड स्टोरी

फ्रेंचायझींनी बीसीसीआयला दिली रिटेन खेळाडूंची यादी

विद्यमान फ्रेंचायझींनी आपल्या रिटेन खेळाडूंची यादी बीसीसीआयकडे सूपूर्द केली आहे. मेगा लिलावापूर्वी अनेक संघांनी दिग्गज खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवला आहे. मेगा लिलावात त्या खेळांडूना काही संघ पुन्हा आपल्या ताफ्यात घेताना दिसतील. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्यासह ईशान किशनला बाहेरचा रस्ता दाखवला. यातील हार्दिक पांड्या नव्या संघाकडून खेळताना दिसू शकतो. याचे संकेतही त्याने दिले आहेत.

ipl auction 2022
Ashes : कागारुंनी पाहुण्या इंग्लंडसमोर ठेवलं डोंगराएवढं लक्ष्य

आयपीएलच्या हंगामात पहिल्यांदा मैदानात उतरणाऱ्या लखनऊ फ्रेंचायझींने संघ बांधणीला सुरुवात केली आहे. त्यांना अँडी फ्लावर यांना मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्त केले असून गौतम गंभीरला मेंटार म्हणून निवडले आहे. हा संघ लोकेश राहुलला आपल्या ताफ्यात घेण्यासाठी प्रयत्नशील आहे. लखनऊने लोकेश राहुल आणि राशिद खानसोबत बोलणी सुरु केल्याची चर्चा रंगली होती. यासंदर्भात पंजाब किंग्ज आणि हैदराबादने आक्षेपही नोंदवला होता. त्यामुळे त्यांच्या संघ बांधणीत कोणत्या तीन खेळाडूंना संघात घेणार हे पाहण्याजोगे ठरेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com