पांड्या अहमदाबादचा कॅप्टन हा तर मोठा जुगार : आकाश चोप्रा | Hardik Pandya Ahmedabad franchise Captain | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Hardik Pandya Ahmedabad franchise Captain
पांड्या अहमदाबादचा कॅप्टन हा तर मोठा जुगार : आकाश चोप्रा

पांड्या अहमदाबादचा कॅप्टन हा तर मोठा जुगार : आकाश चोप्रा

नवी दिल्ली : आयपीएलचे मेगा ऑक्शन (IPL 2022 Mega Auction) काही आठवड्यांवर येऊन ठेपले आहे. दरम्यान, नव्या दोन संघांना देखील काही खेळाडू आधीच घेऊन ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे. दरम्यान आयपीएल मधील नवीन संघ अहमदाबादने (Ahmedabad franchise) हार्दिक पांड्या (Hardik Pandya), राशीद खान (Rashid Khan) आणि शुभमन गिलला (Shubman Gill) निवडण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त आले. याचबरोबर हार्दिक पांड्याला अहमदाबाद कॅप्टनही करणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे.

हेही वाचा: आफ्रिदी फिव्हर! PCB ने वयाच्या घोटाळ्यावरुन स्पर्धा केल्या स्थगित

याबाबत समालोचक आणि माजी खेळाडू आकाश चोप्राने (Akash Chopra) आपली प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला, 'हार्दिक पांड्या हा अहमदाबाद संघाचा कर्णधार असू शकतो. अहमदाबाद फ्रेंचायजी मोठा जुगार खेळत आहे. मी हार्दिकचे नेतृत्व पाहिलेले नाही. त्याला कर्णधाराच्या रुपात अजून कोणीही पाहिलेले नाही. त्यामुळे हे काहीतरी वेगळेच होणार आहे.' (Hardik Pandya Ahmedabad franchise Captain)

हेही वाचा: धोतर - कुर्ता घालून क्रिकेट, संस्कृतमध्ये कॉमेंटरी

चोप्रा पुढे म्हणाला की, 'नक्कीच अहमदाबादचे आणि हार्दिक पांड्याचे लोकल कनेक्शन आहे. तुम्हाला लोकल ब्रँड अ‍ॅम्बेसेडर मिळाला आहे. पण, अजूनही त्याच्या फिटनेसबाबत (Hardik Pandya Fitness) प्रश्नचिन्ह आहे. त्याच्या गोलंदाजीबाबत काळजी आहे. पण, तो फक्त कर्णधार म्हणून संघात असू शकतो.

पांड्याच्या नेतृत्वाबाबत शंका व्यक्त करणाऱ्या आकाश चोप्राने पांड्याचे कौतुक देखील केले. तो म्हणाला 'पांड्या हा भारताचे वैभव आहे. चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करणारा असा फलंदाज भारतात अजून तरी पाहिलेला नाही. जगभरातही असे थोडचे आहे. तो उत्साही असतो. तो टी 20 वर्ल्डकपमध्ये भारताचे नशिब बदलू शकतो. जर त्याने फलंदाजी आणि गोलंदाजी केली तर! त्याच्या फिटनेसबाबत काही शंका अजूनही आहे.'

Web Title: Ipl 2022 Hardik Pandya Captain Akash Chopra Says Ahmedabad Franchise Has Played A Big Bet

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..