IPL 2022 Mega Auction : MI रोहितसह या चौघांना करु शकते Retain | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai Indians
IPL 2022 : MI रोहितसह या खेळाडूंना करु शकते Retain

IPL 2022 : MI रोहितसह या चौघांना करु शकते Retain

sakal_logo
By
सुशांत जाधव

आयपीएलच्या नव्या हंगामात नव्या दोन संघासह विद्यमान संघही नव्या बांधणीसह मैदानात उतरणार आहेत. आयपीएल 2022 साठीचा मेगा लिलाव डिसेंबरमध्ये पार पडणार आहे. नव्याने संघ बांधणी करण्यापूर्वी कोणता संघ आपल्या कोणत्या खेळाडूंना रिटेन करणार हा विषय सध्या चांगलाच चर्चेत आहे. बीसीसीआयने याआधीच रिटेशन पॉलिसी (Retention Policy) स्पष्ट केली आहे. बीसीसीआयच्या पॉलिसीनुसार, विद्यमान आठ संघांना प्रत्येकी 4 खेळाडू रिटेन करता येणार आहे. फ्रेंचायझींना 30 नोव्हेंबरपर्यंत खेळाडूंना रिटेन केल्याची मुदत आहे. यासाठी आता अवघे चार-पाच दिवस उरले आहेत.

मुंबई इंडियन्सच्या ताफ्यातून कर्णधार रोहित शर्मासह जलदगती गोलंदाज जसप्रित बुमराहला रिटेन केले जाणार असल्याची चर्चा आहे. या दोघांशिवाय इशान किशन आणि कॅरेबियन अष्टपैलू केरॉन पोलार्डच्या नावाचाही समावेश असल्याचे बोलले जात आहे. सध्याच्या घडीला आपल्या चौफेर फटकेबाजीनं लक्षवेधून घेत टीम इंडियात स्थान मिळवलेल्या सूर्यकुमार यादवलाही मुंबई इंडियन्स आपल्या ताफ्यात ठेवण्यास उत्सुक असेल. पण त्याला रिलिज करुन पुन्हा मेगा लिलावाच्या माध्यमातून मुंबई इंडियन्स त्याला आपल्या ताफ्यात सामील करुन घेऊ शकते.

हेही वाचा: IND vs NZ 1st Test शुबमन गिलचा अर्धशतकी 'चौकार'

इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, कोलकाता नाईट रायडर्सचा संघ वेस्ट इंडिजचा अष्टपैलू खेळाडू आंद्रे रसेल, सुनील नारायण या परदेशी खेळाडूंसह व्यंकटेश अय्यर, शुबमन गिल आणि वरुण चक्रवर्ती या नावाचा विचार करत आहे. शुबमन गिल आणि व्यंकटेश अय्यरने लक्षवेधी कामगिरी करुन दाखवली आहे. त्यामुळे कोलकाता नाइट रायडर्समध्ये या दोघांचा विचार प्राधान्याने केला जाऊ शकतो. .

हेही वाचा: अब तक थ्री नॉट थ्री! गावसकरांकडून अय्यरला मिळाली टेस्ट कॅप

काय आहे रिटेशन पॉलिसी

फ्रेंचायझी चार खेळाडूंना रिटेन करु शकते. यात संघांना दोनपेक्षा अधिक परदेशी खेळाडूंना रिटेन करता येणार नाही. याचा अर्थ रिटेन करताना 3 -1 (देश-परदेश) किंवा 2-2 (देश-परदेश) असा फार्म्युला फ्रेंचाइझींना आखता येईल. याशिवाय जे दोन नवे संघ सहभागी होणार आहेत त्यांना मेगा लिलावापूर्वी प्रत्येकी तीन खेळाडू आपल्या संघात घेता येणार आहेत. 30 नोव्हेंबर ही खेळाडू रिटेन करण्याची अंतिम तारीख आहे. त्यानंतरच कोणत्या संघाने कोणत्या खेळाडूंना रिटेन केले हे अधिकृतरित्या स्पष्ट होईल.

loading image
go to top