IPL Auction Live Streaming: आयपीएल 2023 साठी लिलाव कधी अन् कुठे पाहायचा?

IPL 2023 Auction When and where to watch the IPL mini auction Livestream
IPL 2023 Auction When and where to watch the IPL mini auction Livestream

IPL Auction 2023 Live Streaming : आयपीएल 2023 साठी होणाऱ्या लिलावात 10 फ्रेंचायझी संघांच्या लिलावात एकूण 206.5 कोटी रुपये आहेत. या रकमेसह या संघांना एकूण 87 खेळाडूंची निवड करण्याचा पर्याय आहे. या 87 रिक्‍त स्‍लॉट्ससाठी 991 खेळाडूंनी नोंदणी केली होती, त्यापैकी 405 खेळाडू निवडले गेले आहेत.

IPL 2023 Auction When and where to watch the IPL mini auction Livestream
रमीझ राजा म्हणजे नुसत्याच तोंडाच्या वाफा; वर्ल्डकप बहिष्कारावरून ICC समोर घातले लोटांगण
  • IPL 2023 साठी मिनी लिलाव कुठे होणार आहे ?

    यावेळी केरळमधील कोची शहरात लिलाव होणार आहे.

  • लिलाव कधी आणि किती वाजता सुरू होईल?

    आयपीएलचा लिलाव 23 डिसेंबर रोजी दुपारी 2.30 वाजता सुरू होईल.

  • लिलावाचे थेट प्रक्षेपण होईल का?

    लिलावाचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध वाहिन्यांवर केले जाईल.

  • लिलावाचे लाईव्ह स्ट्रीमिंग देखील उपलब्ध असेल का?

    या लिलावाचे लाईव्ह स्ट्रीमिंग जिओ सिनेमा अॅपवर पाहता येईल.

    (IPL 2023 Auction When and where to watch the IPL mini auction Livestream)

IPL 2023 Auction When and where to watch the IPL mini auction Livestream
Kuldeep Yadav : अविश्वसनीय! सौम्य शब्द वापरतोय नाही तर... सुनिल गावसकर टीम इंडियावर जाम भडकले

लिलावासाठी निवडलेल्या 405 खेळाडूंपैकी 273 भारतीय आणि 132 विदेशी खेळाडू आहेत. यातील 119 खेळाडूंना आंतरराष्ट्रीय सामने खेळण्याचा अनुभव आहे. उर्वरित 282 खेळाडू अनकॅप्ड आहेत. 19 खेळाडूंची मूळ किंमत 2 कोटी आहे. या मध्ये एकही भारतीय खेळाडू नाही. 11 खेळाडूंची मूळ किंमत 1.5 कोटी आणि 20 खेळाडूंची मूळ किंमत एक कोटी आहे. लिलावात सनरायझर्स हैदराबादकडे सर्वाधिक पैसे (42.25 कोटी) आणि कोलकाता नाइट रायडर्सकडे सर्वात कमी पैसे (7.05 कोटी) आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com