IPL 2023 Broadcast War
IPL 2023 Broadcast War ESAKAL

IPL 2023 : तुमचा धोनी तर आमचा रोहित! हंगाम सुरू होण्यापूर्वीच जिओ अन् स्टारमध्ये 4K युद्ध

IPL 2023 Broadcast War : इंडियन प्रीमियर लीग 2023 चा हंगाम सुरू होण्यास अवघे काही तास शिल्लक आहेत. मात्र गतविजेता गुजरात आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यातील सलामीच्या सामन्याची चर्चा होण्यापेक्षा या सामन्याचे प्रक्षेपण करणाऱ्या दोन कंपन्यांचीच जोरदार चर्चा सुरू झाली आहे. डिसने हॉटस्टार आणि व्हायकॉम 18 हे एकमेकांशी भिडले आहेत. डिसने हॉटस्टारने खास आयपीएलसाठी भारताचा सर्वात पहिला 4K टीव्ही चॅनल शुक्रवारी लाँच करणार असल्याची घोषणा केली.

यापूर्वी जिओ सिनेमाने आयपीएलचे सामने 4K वर दाखवणार असल्याची घोषणा केली होती. आता याला प्रत्युत्तर म्हणून स्टार स्पोर्ट्स 4K ची घोषणा झाली असून हंगामातील गुजरात टायटन्स विरूद्ध चेन्नई सुपर किंग्ज हा हाय व्होल्टेज सामना 4K या अल्ट्रा हाय डेफिनेशन चॅनलवर पाहता येणार आहे.

IPL 2023 Broadcast War
Umesh Yadav: आयपीएलवरच माझी कारकीर्द ठरणार! खुद्द उमेश यादवने दिले निवृत्तीचे संकेत?

एअरटेल डिजीटल टिव्ही, टाटा प्ले आणि व्हिडिओकॉन डी2एचने देखील स्टार स्पोर्ट्सच्या 4K चॅनलचा समावेश केला आहे. मात्र हा चॅनल जिओ टीव्हीवर उपलब्ध असणार की नाही हे अजून कळू शकलेले नाही. स्टार स्पोर्ट्सने आयसीसी क्रिकेट वर्ल्डकप 2015 च्या सामन्यांचे रिप्ले दाखवत 4K चॅनलचे टेस्टिंग सुरू केले आहे. स्टार स्पोर्ट्स सामन्यांचे लाईव्ह प्रक्षेपण हे नेटिव्ह 4K रिझोल्युशनवर किंवा 4K अपस्केल्डवर दाखवणार हे अजून स्पष्ट झालेले नाही.

स्टार स्पोर्ट्सने 4K चॅनलची चाचपणी 2015 च्या वर्ल्डकप दरम्यान देखील केली होती. मात्र त्यावेळी फार कोणाकडे 4K टीव्ही सेट्स नव्हते. तेव्हा 4K ची तेवढी क्रेझ देखील नव्हती. मात्र आता 4K टीव्ही स्टेट हे परवडणाऱ्या दरात मिळतात. आता 4K टीव्ही सेटचे मार्केट हे सर्वसामन्यांच्या खिशात मावते आहे.

स्टार स्पोर्ट्स आणि जिओ सिनेमा यांच्यात समालोचकांची तगडी टीम तयार करण्यात देखील मोठी रस्सीखेच सुरू असल्याचे दिसत आहे. नुकतेच स्टार स्पोर्ट्सने आपल्या पॅनलमध्ये स्टिव्ह स्मिथ आणि रवी शास्त्री यांचा समावेश केला आहे. स्टार स्पोर्ट्स आयपीएलचे प्रक्षेपण हे 9 भाषात करणार आहे तर जिओ सिनेमा याचे प्रक्षेपण हे 12 भाषांमध्ये करत आहे.

IPL 2023 Broadcast War
Asia Cup Cricket : पाकिस्तान वर्ल्डकपमधील लढती भारतात खेळण्याची शक्यता कमी

यंदाच्या आयपीएल हंगामात स्टार स्पोर्ट्स पहिल्यांदाच व्हायकॉम 18 सोबत माध्यम हक्क शेअर करणार आहेत. टीव्ही हक्क स्टार स्पोर्ट्सकडे आहेत तर डीजीटल राईट्स हे व्हायकॉम 18 कडे आहेत. त्यामुळे या दोन प्रक्षेपण कंपन्यांमध्ये जास्तीजास्त प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे. जिओ सिनेमाने एमएस धोनी आणि सूर्यकुमार यादवला आपला ब्रँड अम्बेसिडर केलं आहे. तर स्टार स्पोर्ट्सने विराट कोहली आणि रोहित शर्माला गळाला लावले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com