IPL 2023 संदर्भात BCCI अध्यक्ष सौरव गांगुलीची मोठी घोषणा; पुढील वर्षापासून...

आयपीएलचे स्वरूप पुढील वर्षीपासून पुन्हा बदलणार
IPL 2023
IPL 2023sakal

IPL 2023 Format Big UPDATE : आयपीएलचे स्वरूप पुढील वर्षीपासून पुन्हा बदलणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) अध्यक्ष सौरव गांगुली यांनी याबाबत माहिती दिली आहे. पुढील वर्षापासून म्हणजेच 2023 च्या सीझनपासून आयपीएल कोविड-19 पूर्वीच्या जुन्या फॉर्मेटमध्ये परत येणार आहे, ज्यामध्ये संघ त्यांच्या घरच्या मैदानावर आणि विरोधी संघाच्या मैदानावर सामने खेळणार आहे.

2020 मध्ये यूएई, दुबई, शारजा आणि अबू धाबी या तीन ठिकाणी रिकाम्या स्टेडियममध्ये त्याचे आयोजन करण्यात आले होते. 2021 मध्ये ही T20 स्पर्धा दिल्ली, अहमदाबाद, मुंबई आणि चेन्नई या चार ठिकाणी आयोजित करण्यात आली. आता महामारी नियंत्रणात आहे त्यामुळे ही लीग घरच्या मैदानावर आणि विरोधी संघाच्या मैदानावर जुन्या फॉरमॅटमध्ये खेळवली जाणार आहे.

IPL 2023
IND vs AUS: पावसाचे संकट, तरीही पाटा खेळपट्टीवर गोलंदाजांची अग्निपरीक्षा

बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली याबाबत म्हणाले की, 'आयपीएल पुढील वर्षापासून घरच्या मैदानावर आणि विरोधी संघाच्या मैदानावर सामने (होम-अवे) खेळण्याच्या फॉरमॅटमध्ये आयोजित केले जाईल. सहभागी १० संघ त्यांच्या घरच्या मैदानावर आपापले सामने खेळतील. बीसीसीआयने या संदर्भातील पत्र राज्य संघटनांना पाठवले आहे. 2020 नंतर प्रथमच BCCI आपला संपूर्ण देशांतर्गत हंगाम आयोजित करत आहे.

IPL 2023
ॲशेस मालिकेचा थरार १६ जूनपासून

याशिवाय गांगुलीने महिला आयपीएलबाबतही भूमिका स्पष्ट केली. गांगुली म्हणाले की, बीसीसीआय सध्या महिला आयपीएल आयोजित करण्यावर काम करत आहे. त्याचा पहिला हंगाम पुढील वर्षीच्या सुरुवातीला आयोजित केला जाऊ शकतो. महिलांच्या IPL व्यतिरिक्त BCCI 15 वर्षांखालील मुलींची एकदिवसीय स्पर्धा देखील आयोजित करणार आहे. ही स्पर्धा २६ डिसेंबर ते १२ जानेवारी या कालावधीत बंगळुरू, रांची, राजकोट, इंदूर, रायपूर व पुणे येथे खेळल्या जाईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com