
IPL 2023 New Rules: आयपीएलच्या नियमात बदल! आता नाणेफेकीनंतर होणार खेळाडूंची घोषणा
IPL 2023 New Rules : आयपीएलच्या आगामी मोसमात नियमामध्ये बदल होताना दिसणार आहेत. यानुसार आता दोन्ही कर्णधार नाणेफेक झाल्यानंतर अंतिम अकरा खेळाडूंच्या नावाची यादी जाहीर करणार आहेत. नाणेफेकीच्या कौलाचा फटका बसू नये, दोन्ही संघांना समसमान संधी असायला हवी यासाठी हा निर्णय घेण्यात येणार आहे. अर्थात, या नव्या नियमाबाबत अधिकृत घोषणा अद्याप करण्यात आलेली नाही. क्रीडाविषयक माध्यमावर ही बातमी प्रसिद्ध करण्यात आली आहे.
आयपीएलमधील नियमाबाबत सूत्रांकडून सांगण्यात आले, की सध्या नाणेफेकी आधीच दोन्ही संघांतील कर्णधार एकमेकांकडे अंतिम अकरा खेळाडूंच्या नावांची यादी सोपवतात, पण यापुढे आता नाणेफेकीनंतर अंतिम अकरा खेळाडूंच्या नावांची यादी सोपवणार आहेत. त्यामुळे दोन्ही संघांना आपल्या सोयीनुसार संघ निर्वी येणार आहेत. तसेच इम्पॅक्ट प्लेयर याचा उपयोगही दोन्ही संघांना योग्य वेळी करता येण्याची दाट शक्यता आहे.
आफ्रिकेतील लीगमध्ये अवलंब
दक्षिण आफ्रिकेत पहिल्यांदाच टी- २० लीग या वर्षी खेळवण्यात आली. यामध्ये नाणेफेकीनंतर अंतिम अकरा खेळाडूंची यादी जाहीर करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या स्पर्धेचे संचालक ग्रॅमी स्मिथ या वेळी म्हणाले, आम्ही येथील टी-२० लीगमध्ये नाणेफेकीच्या महत्त्वाला कमी केले.