IPL 2023 : RCB ला मोठा झटका! दिग्गज सलामीवीर दुखापतीने त्रस्त… संपूर्ण हंगामातून बाहेर?

ipl 2023 injured rajat patidar will not be available in first part of ipl doubt over josh hazlewoods play check
ipl 2023 injured rajat patidar will not be available in first part of ipl doubt over josh hazlewoods play check

IPL 2023 : आयपीएल स्पर्धा सुरू होण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. यादरम्यान रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) चा आघाडीचा फलंदाज रजत पाटीदार पायच्या दुखापतीमुळे आगामी इंडियन प्रीमियर लीग (IPL) स्पर्धेत खेळण्यावर प्रश्नचिन्ह लागले आहे . ESPNcricinfo ने दिलेल्या वृत्तानुसार, 29 वर्षीय पाटीदार सध्या बेंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (NCA) मध्ये 'रिहॅबिलिटेशन' प्रक्रियेमधून जात आहे.

तर ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जोश हेझलवूडच्या या स्पर्धेत सहभागी होण्याबाबतही देखील साशंकता आहे कारण तो 'अकिलीस टेंडिनाइटिस'मधून बरा होत आहे. यामुळे फाफ डू प्लेसिसच्या नेतृत्वाखालील संघाच्या आगामी स्पर्धेतील चिंता वाढली आहे. आरसीबीने 32 वर्षीय हेजलवूडला गेल्या वर्षी 7.75 कोटी रुपयांना विकत घेतले होते.

ipl 2023 injured rajat patidar will not be available in first part of ipl doubt over josh hazlewoods play check
Maharashtra Politics : ठाकरेंच्या उर्दू बॅनरचा वाद पेटला! ठाकरे गटाकडून शिंदे-फडणवीसांना जशास तसे उत्तर

पाटीदारच्या बाबतीत बोलायचे झाल्यास, मिळालेल्या माहितीनुसार त्याला पुढील तीन आठवडे विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे, त्यानंतर त्याचे एमआरआय स्कॅन आयपीएलच्या 'सेकंड हाफ'मध्ये त्याचा सहभाग निश्चित करेल. मागील हंगामात आरसीबीसाठी उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पाटीदारला आरसीबीच्या ताफ्यात सामील होण्यापूर्वीच दुखापत झाली होती आणि संघात सामील होण्यासाठी त्याला एनसीएकडून परवानगी मिळवावी लागणार आहे.

ipl 2023 injured rajat patidar will not be available in first part of ipl doubt over josh hazlewoods play check
6,6,6,6,6... IPL 2023 पूर्वी रोव्हमन पॉवेलचे वादळ, वेस्ट इंडिजचा विजय! राजधानी दिल्लीत वाटले पेढे

पाटीदारला गेल्या वर्षीच्या लिलावात स्थान मिळालं नव्हतं परंतु दुखापतीमुळे यष्टीरक्षक लवनीत सिसोदिया जखमी होऊन संघाबाहेर पडल्याने त्याला त्याच्या जागी संधी मिळाली होती. त्यानंतर एलिमिनेटरमध्ये पाटीदारने स्पर्धेच्या इतिहासातील भारतीय खेळाडूचे सर्वात जलद शतक झळकावले. डुप्लेसिस आणि विराट कोहलीनंतर तो आरसीबीसाठी तिसरा सर्वाधिक धावा करणारा खेळाडू होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com