IPL 2023 : MI ने पोलार्डला दिली सोडचिठ्ठी, CSK नं जडेजाबाबत काय केलं? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

IPL 2023 Keiron Pollard Ravindra Jadeja

IPL 2023 : MI ने पोलार्डला दिली सोडचिठ्ठी, CSK नं जडेजाबाबत काय केलं?

IPL 2023 Keiron Pollard Ravindra Jadeja : टी 20 वर्ल्डकपमध्ये भारताने सेमी फायनलमध्येच गाशा गुंडाळावा लागल्यानंतर आता आयपीएलच्या 2023 च्या 16 व्या हंगामाबाबत हालचाली सुरू झाल्या आहेत. येत्या डिसेंबर महिन्यात 2023 च्या हंगामासाठी लिलाव प्रक्रिया होणार आहे. दरम्यान, या लिलाव प्रक्रियेपूर्वी आयपीएल संघांनी काही खेळाडूंना रिलीज केले तर काही खेळाडूंना रिटेन केले आहे. याबाबतची लिस्ट सादर करण्यात आली आहे. मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज या दोन स्टार संघांनी देखील आपली रिटेन आणि रिलीज लिस्ट सादर केली आहे.

हेही वाचा: Irfan Pathan : तुमच्यात अन् आमच्यात हाच फरक आहे! इरफान पठाणनं पाक पंतप्रधानांची लायकी दिली दाखवून

मुंबईची पोलार्डला सोडचिठ्ठी

दरम्यान, मुंबई इंडियन्सने आपला स्टार ऑलराऊंडर किरॉन पोलार्डला रिलीज केले आहे. मुंबई इंडियन्समध्ये रोहित शर्मानंतर पोलार्डच संघाची धुरा खांद्यावर वाहत होता. पोलार्ड 2010 मध्ये पहिल्यांदा मुंबई इंडियन्सकडून खेळला होता. मात्र गेल्या काही हंगामात त्याला लौकिकास साजेसा खेळ करता आलेला नाही. पोलार्ड आता 35 वर्षाचा झाला आहे. मुंबईने पोलार्डबरोबर न्यूझीलंडच्या फॅन एलन, टायमर मिल्स, मयांक मार्कंडेय आणि ऋतिक शौकिनला देखील रिलीज केले आहे.

तर मुंबई इंडियन्सने 10 खेळाडूंना रिटेन केले आहे. यात रोहित शर्मा, डेवाल्ड ब्रेविस, इशान किशन, सूर्यकुमार यादव, डेनियल सॅम्स, टीम डेव्हिड, जोफ्रा आर्चर, जसप्रीत बुमराह, ट्रिस्टन स्टब्स आणि तिलक वर्मा यांना रिटेन केले आहे.

हेही वाचा: Babar Azam : पत्रकार परिषदेत IPL च्या गुगलीवर बाबर भांबावला; अखेर मीडिया मॅनेजर आला धावून

जडेजाबाबत CSK ने घेतला मोठा निर्णय

दुसरीकडे चेन्नई सुपर किंग्जने रविंद्र जडेजाला संघ सोडून दुसरीकडे जाण्यापासून रोखले आहे. मध्यंतरी जडेजा आणि सीएसकेमध्ये दुरावा निर्माण झाला असल्याच्या बातम्या येत होत्या. मात्र सीएसके संघव्यस्थापनाला जडेजाचा रूसवा दूर करण्यात यश आले आहे. चेन्नई सुपर किंग्जने ख्रिस जॉर्डन, एडम मिल्ने आणि मिशेल सँटनर यांना रिलीज केले आहे. त्याचबरोबर नारायण जगदीशन याचा देखील पत्ता कट होणार आहे.

चेन्नईने महेंद्रसिंह धोनी, रविंद्र जडेजा, मोईन अली, शिवम दुबे, ऋतुराज गायकवाड, डेवॉन कॉनवॉय, मुकेश चौधरी, ड्वेन प्रिटोरियस, दीपक चाहर यांना रिटेन केले आहे.

आयपीएलच्या 16 व्या हंगामासाठी येत्या 23 डिसेंबरला कोचीमध्ये लिलाव होणार आहे. 2022 मध्येच मेगा लिलाव झाल्याने हा मिनी लिलाव असणार आहे.