IPL 2023 Punjab Kings Replace Anil Kumble With Trevor Bayliss
IPL 2023 Punjab Kings Replace Anil Kumble With Trevor Bayliss ाेोकोत

IPL 2023 : पंजाब किंग्जने अनिल कुंबळेला दिला नारळ; नव्या हंगामात बायलिस असणार हेड कोच

IPL 2023 Punjab Kings Anil Kumble : पंजाब किंग्जने आयपीएलच्या 2023 हंगामासाठी मुख्य प्रशिक्षक म्हणून ट्रेव्होर बायलिस यांची नियुक्ती केल्याची घोषणा आज केली. त्यामुळे भारताचा माजी कर्णधार अनिल कुंबळे आता पंजाब किंग्जचा प्रशिक्षक असणार नाही याच्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. बायलिस हे इऑन मॉर्गनच्या नेतृत्वात 2019 वर्ल्डकप जिंकणाऱ्या इंग्लंड संघाचे प्रशिक्षक होते. बायलिस यांच्याकडे एक वर्ल्डकप, 2 आयपीएल विजेतेपदं आणि बिग बॅश लीगचे टायटल अशी मोठी अनुभवाची शिदोरी आहे.

IPL 2023 Punjab Kings Replace Anil Kumble With Trevor Bayliss
VIDEO : विराटला पाहून अनुष्काच्या 'चकडा एक्सप्रेस'मधील को-स्टारने असं काही केलं...

पंजाब किंग्जने प्रशिक्षकपदी नियुक्ती केल्यानंतर ट्रेव्होर बायलिस यांनी 'मला पंजाब किंग्जने मुख्य प्रशिक्षक पदाची जबाबदारी दिली हा मी माझा सन्मान समजतो. आयपीएलमधील ही एक सुरूवातीपासूनची फ्रेंचायजी आहे. ही फ्रेंचायजी यशासाठी आग्रही आहे. मी गुणवत्तापूर्ण संघासोबत काम करण्यासाठी उत्सुक आहे.'

अनिल कुंबळेच्या जागी बायलिस यांना पंजाब किंग्जने प्रशिक्षक पदी नियुक्त केले आहे. अनिल कुंबळेला आपल्या तीन वर्षाच्या कार्यकाळात एकदाही पंजाबला प्ले ऑफमध्ये घेऊन जाता आलेले नाही. त्यामुळे यंदाच्या वर्षी त्यांचा करार वाढवण्यात आला नाही. पंजाब किंग्ज 2014 च्या हंगामात आयपीएल फायनल खेळली होती. मात्र त्यांना कोलकाता नाईट रायडर्सकडून पराभव पत्करावा लागला होता.

IPL 2023 Punjab Kings Replace Anil Kumble With Trevor Bayliss
Mumbai Indians : मुंबईला मिळाला नवा हेड कोच; IPL च्या नव्या हंगामासाठी बाऊचरची नियुक्ती

गेल्या आयपीएल हंगामात पंजाब किंग्ज गुणतालिकेत सहाव्या स्थानावर राहिली होती. केएल राहुलने पंजाब किंग्जला सोडचिठ्ठी दिल्यानंतर गेल्या हंगामात मयांक अग्रवालने पंजाब किंग्जचे नेतृत्व केले होते. पंजाबने आयपीएल 2022 मेगा लिलावापूर्वी फक्त मयांक अग्रवाल आणि अर्शदीप सिंग या दोघांनाच रिटेन केले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com