Mumbai Indians : मुंबईला मिळाला नवा हेड कोच; IPL च्या नव्या हंगामासाठी बाऊचरची नियुक्ती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai Indians Mark Boucher

Mumbai Indians : मुंबईला मिळाला नवा हेड कोच; IPL च्या नव्या हंगामासाठी बाऊचरची नियुक्ती

Mumbai Indians Mark Boucher : मुंबई इंडियन्सने आगामी आयपीएल हंगामासाठी नव्या मुख्य प्रशिक्षकाची नियुक्ती केली आहे. दक्षिण आफ्रिकेचा माजी विकेटकिपर फलंदाज मार्क बाऊचर आता मुंबई इंडियन्सचा नवा मुख्य प्रशिक्षक असणार आहे. आज (दि. 19) याबाबतची घोषणा मुंबई इंडियन्सने केली. 45 वर्षाचा मार्क बाऊचर आता श्रीलंकेच्या महेला जयवर्धनेची जागा घेणार आहे. जयवर्धनेला मुंबई इंडियन्सने जागतिक जबाबदारी देत फ्रेंचायजीचा ग्लोबल परफॉर्मन्स हेड केले आहे.

हेही वाचा: Roger Federer Retirement : 'प्रिय रॉजर, हा दिवस कधीच येऊ नये ...' राफाने लिहिली भावनिक पोस्ट

मार्क बाऊचर सध्या दक्षिण आफ्रिकेच्या संघाचा मुख्य प्रशिक्षक आहे. मात्र त्याने यापूर्वीच स्पष्ट केले आहे कीत तो आगामी टी 20 वर्ल्डकपनंतर आपल्या पदावरून पायउतार होणार आहे. त्यामुळे बाऊचर आता आयपीएलच्या ग्लॅमरस दुनियेत दिसेल. मुंबई इंडियन्सच्या मुख्य प्रशिक्षक पदावर नियुक्ती झाल्यावर बाऊचरने प्रतिक्रिया दिली.

बाऊचर म्हणतो, मुंबई इंडियन्सचा मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती होणे हा मी माझा सन्मान समजतो. त्यांचा फ्रेंचायजी म्हणून इतिहास आणि कामगिरीमुळे ते क्रिकेट फ्रेंचायजीमधील सर्वात यशस्वी फ्रेंचायजी म्हणून ओळखली जाते.'

हेही वाचा: James Neesham : केंद्रीय करार नाकारला; पैशासाठी देशाचा संघ सोडला?

बाऊचरच्या नियुक्तीनंतर रिलायन्स जिओ इन्फोकॉमचे चेअरमन आकाश अंबानी म्हणाले, 'मुंबई इंडियन्समध्ये मार्क बाऊचर यांचे स्वागत. त्याने मैदानावर आपली क्षमता सिद्ध करून दाखवली आहेच याचबरोबर त्याने प्रशिक्षक म्हणून आपल्या संघाला अनेक विजयात मोलाचे मार्गदर्शन केले आहे. मार्कच्या येण्याने मुंबई इंडियन्सच्या गुणवत्तेत चांगली वृद्धी झाली आहे. आता तो मुंबई इंडियन्सची लेगसी पुढे नेईल.'

Web Title: Mumbai Indians Appointed Mark Boucher As Head Coach For Upcoming Ipl Season

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..