IPL 2024 : ‘आयपीएल’च्या जाहिरात डिझाईनला कोल्हापुरी टच

दहा कलाकारांकडून सोळा दिवसांत काम पूर्ण : दर्जेदारपणामुळे क्रिकेटपटूंचीही पसंती
ipl 2024 advertisement mi csk team players advertise work in 16 days
ipl 2024 advertisement mi csk team players advertise work in 16 daysSakal

कोल्हापूर : आयटीसह जाहिरात उद्योग क्षेत्रात बंगळूर, पुणे, मुंबई, हैदराबादच्या तुलनेत कोल्हापूर अत्यल्प आहे. मात्र, याच मातीतील दहा कलाकारांनी आयपीएलमधील मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपर किंग्जसारख्या संघांच्या जाहिरात डिझाईन्सचे काम १६ दिवसांत पूर्ण केले आहे. त्याच जाहिराती माध्यमात झळकत आहेत.

‘आयपीएल’मध्ये सामना मुंबई इंडियन्स किंवा चेन्नई सुपर किंग्जचा असला की तो क्रिकेटवेडे पाहतात. याच संघांच्या जाहिरात डिझायन्सचे काम कोल्हापुरात झाले आहे. सहा वर्षे आयपीएलमधील संघांचे असे काम येथे होते.

धोनी, रवींद्र जाडेजा असो वा रोहित शर्मा, हार्दिक पंड्या, जसप्रित बुमराह, सूर्यकुमार यादव, इशान किशन, तिलक वर्मा, मेन्टॉर सचिन तेंडुलकर अशा क्रिकेटपटूंचे डिझाईन्सचे काम केले आहे. यात विराज गवस, अभिषेक जाधव, अजय मोरे, केतन मेस्त्री, अनिकेत गावडे, सूरज पाटील, मयूर सातार्डेकर, नकुल खतावरे यांचा समावेश आहे. हे काम विवेक शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.

चेन्नईसाठी खेळाडूंसह खास बसचे डिझाईन्स

कोल्हापूरच्या कलाकारांनी चैन्नईच्या मागणीवरून खेळाडूंना हॉटेल ते स्टेडियमपर्यंतचा प्रवासासाठी जी अलिशान बस वापरली जाते. त्याच्यावरील डिझाईन्सचे काम पूर्ण केले आहे.

पुणे, मुंबई, बंगळूर, हैदराबादसारखे कोल्हापुरात जाहिरातीचे क्षेत्र मोठे नाही. मात्र, येथील कलाकारांच्या दर्जेदार कामामुळे डिझायन्सचे काम अल्पावधीत पूर्ण केले आहे. हे मोठे आव्हानात्मक काम सहा वर्षे कोल्हापुरातील कलाकारांकडून करून घेत आहोत.

- विवेक शिंदे, संचालक, स्पोर्टाकुलर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com