IPL 2024 पूर्वी RR अन् LSG चा मोठा निर्णय! 2 शक्तिशाली खेळाडूची अदलाबदल, कोणाला मिळणार फायदा?

IPL 2024
IPL 2024

IPL 2024: विश्वचषकानंतर आता आयपीएलचा थरार रंगणार आहे. यासाठी तयारी देखील सुरु झाली आहे. आयपीएलच्या आगामी हंगामासाठी खेळाडूंचा लिलाव 19 डिसेंबरला होणार आहे. त्याआधी फ्रँचायझींमध्ये खेळाडूंबाबत ट्रेड प्रक्रिया सुरू झाली आहे. यानुसार राजस्थान रॉयल्स आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात करार झाला आहे.

राजस्थानचा फलंदाज देवदत्त पडिक्कल पुढील वर्षी केएल राहुलच्या नेतृत्वाखाली लखनऊ सुपर जायंट्सकडून खेळताना दिसणार आहे. फ्रँचायझीने याबाबत अधिकृत घोषणा केली आहे. तसेच वेगवान गोलंदाज आवेश खान राजस्थान संघात सामील झाला आहे.

आवेश खानची ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या आगामी टी-20 मालिकेसाठी टीम इंडियात निवड झाली आहे. त्याला लखनऊने 2022 मध्ये 10 कोटी रुपयांना विकत घेतले होते. दुसरीकडे, देवदत्त पडिक्कलला राजस्थानने 7.75 कोटी रुपयांना विकत घेतले होते. देवदत्त आणि आवेश यांनी आयपीएलमध्ये चांगली सुरुवात केली होती, परंतु 2023 च्या मोसमात दोघांनीही चांगली कामगिरी केली नाही.

विशेषत: पडिक्कल 2022 मध्ये 17 सामने आणि 2023 मध्ये 11 सामने खेळूनही राजस्थानसाठी आपली छाप सोडू शकला नाही. त्याने दोन हंगामात 28 सामन्यात 23.59 च्या सरासरीने आणि 125.88 च्या स्ट्राईक रेटने 637 धावा केल्या. या काळात त्याला केवळ तीन अर्धशतके करता आली. लखनऊ सुपर जायंट्स हा पडिक्कलचा तिसरा आयपीएल संघ असेल. यापूर्वी 2020 आणि 2021 मध्ये तो रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून खेळला होता.

IPL 2024
Pat Cummins Video : इतना सन्नाटा क्यु है भाई! वर्ल्ड कप जिंकल्यानंतर कर्णधारचं ऑस्ट्रेलियात कसं झालं स्वागत...

आवेश खानचा राजस्थान रॉयल्स हा त्याचा तिसरा संघ असेल. त्याने 2021 मध्ये दिल्ली कॅपिटल्ससाठी पदार्पण केले. त्यानंतर त्याने 24 विकेट घेतल्या. यानंतर दिल्लीने त्याला मेगा-लिलावासाठी संघातून वगळले. लिलावात तिन्ही संघांना हरवून लखनऊने आवेशला विकत घेतले होते. 2022 मध्ये, तो लखनऊसाठी सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज होता आणि त्याचा संघ प्लेऑफमध्ये देखील पोहोचला होता. (Latest Marathi News)

मात्र 2023 मध्ये लखनऊकडून संथ खेळपट्ट्यांवर आवेशची गोलंदाजी प्रभावी ठरली नाही. त्याला नऊ सामन्यांत केवळ पाच वेळा चार षटकांचा कोटा पूर्ण करता आला. या मोसमात त्याला केवळ आठ विकेट्स मिळाल्या. दरम्यान तो पुन्हा एकदा आयपीएलमध्ये छाप पाडण्याच्या तयारीत आहे. राजस्थानमध्ये त्याला प्रसिद्ध कृष्णा, नवदीप सैनी, कुलदीप सेन, संदीप शर्मा आणि केएम आसिफ यांची साथ मिळेल.

IPL 2024
Mohammed Shami : 'संपूर्ण टीम हॉटेलला जायची, मी मात्र हॉस्पिटलमध्ये जाऊन...' वर्ल्ड कपनंतर शमीचा धक्कादायक खुलासा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com