IPL 2024 RR vs DC : ट्रिस्टन स्टब्सचा सामना ट्विस्ट करण्याचा प्रयत्न आवेशने हाणून पाडला, राजस्थानचा शानदार विजय

Rajasthan Royals vs Delhi Capitals Scorecard Updates News : आयपीएल 2024 मधील नववा सामना जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात खेळला जात आहे.
IPL 2024 RR vs DC Live Score Updates News
IPL 2024 RR vs DC Live Score Updates Newsesakal

Rajasthan Royals vs Delhi Capitals Live Score :

राजस्थान रॉयल्सने ठेवलेल्या 186 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीने चांगला दम दाखवला मात्र राजस्थानने सामना 12 धावांनी जिंकून यंदाच्या हंगामात होम ग्राऊंडवर विजय मिळवण्याचा सिलसिला कायम ठेवला. दिल्लीकडून ट्रिस्टन स्टब्सने 23 चेंडूत 44 धावा केल्या तर डेव्हिड वॉर्नरने 49 धावा करत संघाला चांगली सुरूवात करून दिली.

आयपीएलच्या 9 व्या सामन्यात आज राजस्थान रॉयल्सने दिल्ली कॅपिटल्ससमोर विजयासाठी 186 धावांचे आव्हान ठेवले. राजस्थान रॉयल्सकडून रियान परागने 45 चेडूत 84 धावांची नाबाद खेळी केली. त्याने संघ अडचणीत असताना रविचंद्रन अश्विन आणि ध्रुव जुरेलसोबत अर्धशतकी भागीदारी देखील रचली. राजस्थानकडून अश्विनने 29 तर ध्रुव जुरेलने 20 धावांची खेळी केली.

प्रत्येक आयपीएल हंगामात राजस्थान रियान परागला सातत्याने खेळवत राहिली. मात्र त्याच्याकडून म्हणावी तशी कामगिरी होत नव्हती. तो यामुळे प्रत्येक हंगामात ट्रोल देखील होत होता. अखेर रियान परागने आपलं नाणं खणखणीत वाजवून दाखवलं. त्याच्या यशाचे जितके त्याला श्रेय जाते तितकेच ते राजस्थान रॉयल्सला देखील जाते. त्यांनी त्याच्यावर सातत्याने विश्वास दाखवला.

IPL 2024 RR vs DC Live Score : ट्रिस्टन स्टब्स केली अश्विनची धुलाई, सामन्यात येणार मोठा ट्विट्स?

अश्विन टाकत असलेल्या 17 व्या षटकात ट्रेंट बोल्टने ट्रिस्टन स्टब्सचा एक साधा झेल सोडला. त्यानंतर स्टब्सने अश्विनच्या या षटकात 19 धावा चोपून सामन्यात ट्विस्ट निर्माण केला.

IPL 2024 RR vs DC Live Score : युझवेंद्र चहलने दिल्लीला दिला मोठा धक्का, कर्णधार पंत माघारी

युझवेंद्र चहलने 26 चेंडूत 28 धावा करणाऱ्या ऋषभ पंतला बाद करत दिल्लीला एक मोठा धक्का दिला.

IPL 2024 RR vs DC Live Score : डेव्हिड वॉर्नरचे अर्धशतक हुकले, आवेश खानने दिला दिल्लीला मोठा धक्का

आवेश खानने दिल्ली कॅपिटल्सचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नरला 49 धावांवर बाद करत तिसरा धक्का दिला. दिल्लीची अवस्था 11.2 षटकात 3 बाद 97 धावा अशी केली.

पॉवर प्लेमध्ये दिल्लीने गमावल्या दोन विकेट्स 

राजस्थानचे 186 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या दिल्ली कॅपिटल्सने पॉवर प्लेमध्येच दोन फलंदाज गमावले. नांद्रे बर्जरने मिचेल मार्शची खेळी 23 धावांवर संपुष्टात आणली. त्यानंतर बर्जरने रिकी भुईला देखील शुन्यावर माघारी धाडले.

IPL 2024 RR vs DC Live Score : 4, 4, 6, 4, 6, 1 रियान पराग देर आये मगर दुरूस्त आये! सर्वात वेगवान गोलंदाजाला दिला चोप

रियान परागने दिल्ली विरूद्धच्या सामन्यात आंद्रे नॉर्त्जियाला शेवटच्या षटकात 25 धावा ठोकत राजस्थानला 20 षटकात 5 बाद 185 धावांपर्यंत पोहचवले. रियान परागने 45 चेंडूत नाबाद 84 धावांची खेळी केली. राजस्थानने 16 ते 20 या षटकांमध्ये तब्बल 77 धावा ठोकल्या.

IPL 2024 RR vs DC Live Score : रियान परागची आक्रमक अर्धशतकी खेळी, राजस्थानची सन्मानजनक धावसंख्येकडे कूच

रियान परागने 34 चेंडूत अर्धशतक ठोकत राजस्थान रॉयल्सला 16 षटकात 123 धावांपर्यंत पोहचवले.

IPL 2024 RR vs DC Live Score : रियान परागची आक्रमक फलंदाजी, राजस्थानने पार केलं शतक

रियान परागने खलील अहमदविरूद्ध आक्रमक फलंदाजी करत राजस्थानला 15 व्या षटकात शतकी मजल मारून दिली. राजस्थानने 15 षटकात 4 बाद 108 धावा केल्या आहेत.

IPL 2024 RR vs DC Live Score : अश्विन-रियानची अर्धशतकी भागीदारी अखेर अक्षरने फोडली

अक्षर पटेलने 29 धावांवर खेळणाऱ्या रविचंद्रन अश्विनला बाद केले. पटेलने रियान अन् अश्विनची चौथ्या विकेटसाठीची 54 धावांची भागीदारी तोडली.

IPL 2024 RR vs DC Live Score : दिल्लीचा दमदार मारा; राजस्थानची पॉवर प्लेमध्ये खराब कामगिरी

दिल्ली कॅपिटल्सने दमदार गोलंदाजी करत राजस्थानची अवस्ता 7 षटकात 3 बाद 36 धावा अशी अवस्था केली. राजस्थानकडून खलील अहमद, कुलदीप यादव आणि मुकेश कुमार यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

पॉवर प्लेमध्ये दिल्लीच्या गोलंदाजांचा टिच्चून मारा 

नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करणाऱ्या दिल्लीने पॉवर प्लेमध्ये टिच्चून मारा केला. राजस्थानला 4 षटकात 26 धावांवर रोखत दिल्लीने यशस्वी जयस्वालचा एक बळी देखील मिळवला.

ऋषभ पंतने नाणेफेक जिंकली.

ऋषभ पंतने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. खेळपट्टीवर नंतर दव पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे पंतने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दिल्ली कॅपिटल्सने संघात दोन बदल केले आहेत. इशांत शर्मा आणि शाय होप दुखापतीमुळे बाहेर गेले आहेत. त्यांच्या ऐवजी नॉर्त्जिया आणि मुकेश कुमार संघात आले आहेत.

ऋषभ पंत खेळणार दिल्लीकडून आपला 100 वा सामना 

दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंत हा आज आपला 100 वा आयपीएल सामना खेळणार आहे. दिल्लीकडून 100 वा आयपीएल सामना खेळणारा तो पहिला खेळाडू आहे. यापूर्वी अमित मिश्राने दिल्लीकडून 99 आयपीएल सामने खेळले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com