

IPL 2028 May Feature 12 Teams BCCI Secretary Speaks on Indian Premier League Expansion and New Franchise Plans
sakal
नवी दिल्ली : आयपीएलमधील संघांची संख्या १० वरून १२ करण्याच्या चर्चा भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सचिव देवाजित सैकिया यांनी फेटाळून लावल्या आहेत. बीसीसीआयमध्ये या विषयावर अद्याप अनौपचारिक चर्चाही झालेली नाही, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. जागतिक क्रिकेट बाजारात आयपीएलबाबत मोठी उत्सुकता असली तरी, सध्या तरी संघ वाढवण्यास कोणताही वाव नसल्याचे सैकिया यांनी सांगितले.