IPL Cricket : 'आयपीएल'मध्ये घुमताहेत नाद्या बाद, कट्ट्यावर खेंदूळ, विषय पंपावर..! अस्सल कोल्हापुरी शब्दांत प्रसाद करतोय समालोचन

IPL Cricket 2025 Prasad Kshirsagar : प्रसाद खरंतर आयआयटीला (IIT) जाण्यासाठी पुण्यात गरवारे कॉलेजमध्ये अकरावी विज्ञान शाखेसाठी प्रवेश मिळवण्यासाठी गेला होता. अकरावी, बारावी करताना त्याला मित्रमंडळींमुळे लघुनाटक, नाटिका करण्याचा छंद लागला.
IPL Cricket 2025 Prasad Kshirsagar
IPL Cricket 2025 Prasad Kshirsagaresakal
Updated on
Summary

"आयपीएलमध्ये बारा भाषांत क्रिकेटचे समालोचन होते. त्यात कोल्हापुरी शब्दांमुळे मराठीतून आयपीएलचे सामने बघण्याचे क्रिकेटप्रेमींचे प्रमाण वाढले आहे."

कोल्हापूर : ‘नाद खुळा’, ‘खटक्यावर बोट, जाग्यावर पलटी’, ‘नाद्या बाद’, ‘विषय पंपावर’, ‘कट्ट्यावर खेंदूळ’ अशा एक ना अनेक अस्सल कोल्हापुरी शब्द आयपीएल क्रिकेटच्या (IPL Cricket) यंदाच्या पर्वात क्रिकेट रसिकांना ऐकायला मिळणार आहेत. कारण सलग तिसऱ्या वर्षी महाडिक वसाहतीतील प्रसाद क्षीरसागर (Prasad Kshirsagar) जगातील क्रिकेटच्या महामेळ्यात समालोचक (Commentator) म्हणून काम करीत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com