esakal | MI विरुद्ध रैनाचा द्विशतकी विक्रम
sakal

बोलून बातमी शोधा

csk

MI विरुद्ध रैनाचा द्विशतकी विक्रम

sakal_logo
By
सुशांत जाधव

MI vs CSK: मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्यात सुरेश रैनाने खास विक्रम आपल्या नावे केलाय. दिल्ली येथील अरुण जेटली स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंयिडन्स यांच्यातील सामना रंगला आहे. सुरेश रैनासाठी आयपीएलमधील हा 200 वा सामना आहे. आयपीएलमध्ये 200 सामने खेळणारा तो चौथा खेळाडू आहे. यापूर्वी रोहित शर्मा, महेंद्रसिंह धोनी आणि दिनेश कार्तिकने 200 सामन्यांचा टप्पा पार केला आहे. मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने चेन्नई विरुद्धच्या सामन्यात टॉस जिंकून पहिल्यांदा गोलंदाजीचा निर्णय घेतलाय. 200 व्या सामन्यात अविस्मरणीय खेळी करण्यात तो यशस्वी ठरणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरले.

हेही वाचा: IPL 2021: ऋतू बहरला; CSK पुन्हा टॉपला!

युएईच्या मैदानात रंगलेल्या आयपीएल स्पर्धेतून रैना वैयक्तिक कारणास्तव माघार घेतली होती. 2019 पूर्वी झालेल्या लिलावापूर्वी चेन्नई सुपर किंग्जच्या संघाने रैनाला रिटेन करत त्याच्यावर विश्वास दाखवला होता. यंदाच्या हंगामात आतापर्यंत त्याने हा विश्वास सार्थ ठरवलाय. पहिल्या सामन्यात त्याने अर्धशतकी खेळी केली होती. त्यानंतरच्या सामन्यात तो मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला असला तरी संघासाठी महत्त्वपूर्ण योगदान देण्याची जबाबदारी त्याने पार पाडली आहे.

हेही वाचा: धोनीनंतर पुणेकर ऋतूराज होऊ शकतो CSK चा सेनापती!

आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो तिसऱ्या क्रमांकावर आहे. विराट कोहली आणि शिखर धवन यांच्यानंतर त्याचा नंबर लागतो. आयपीएलमध्ये 6000 + धावा करणारा विराट हा पहिला फलंदाज आहे. चेन्नई सुपर किंग्जने 6 सामन्यात 5 सामन्यातील विजयासह 10 गुण मिळवून पॉइंट टेबलमध्ये टॉपला आहे.

loading image