IPL : यशस्वी, रिंकूची वर्ल्डकपसाठी दावेवारी

रवी शास्त्री यांनी केले कौतुक; शक्य झाल्यास संधी द्या !
yashasvi jaiswal and rinku singh
yashasvi jaiswal and rinku singhsakal

नवी दिल्ली - यंदाच्या आयपीएलमध्ये सर्वांना प्रभावित करणाऱ्या यशस्वी जयस्वाल आणि रिंकू सिंग यांच्या कामगिरीवर टीम इंडियाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री हेसुद्धा भारावले आहेत. देशात होणाऱ्या एकदिवसीय विश्वकरंडक स्पर्धेत मुख्य संघातील कोणी खेळाडू दुखापतग्रस्त झाला तर या दोघांना संधी द्यावी, असे शास्त्री यांनी सुचवले आहे.

yashasvi jaiswal and rinku singh
IPL : बंगळूरचे प्ले ऑफच्या दिशेने ठाम पाऊल

यशस्वीने या आयपीएल मोसमात ज्या प्रकारे फलंदाजी केली त्याला तोड नाही. गतवेळच्या तुलनेत यंदा त्याने केलेली प्रगती अफलातून आहे. हे सकारात्मक चिन्ह आहे, असे सांगून शास्त्री पुढे म्हणाले, असे खेळाडू आपल्या खेळावर फार मेहनत घेत असतात हे सिद्ध होते, तसेच त्याच्या बॅटमधली ताकद आणि टायमिंग यामुळे तो करत असलेली सभोवार फटकेबाजी यात कमालीची सुधारणा झाली आहे.

राजस्थान संघात आंतरराष्ट्रीय अनुभव असलेले फलंदाज असले तरी जयस्वालने १३ सामन्यांतून ५७५ धावा केल्या आहेत; तर रिंकू सिंगने गतविजेत्या गुजरात संघाविरुद्ध अंतिम चेंडूवर विजयी षटकार मारून स्पर्धेत वेगळेच रंग भरले. विशेष म्हणजे अशा कामगिरीत त्याने सातत्य राखले आहे. रिंकूने या स्पर्धेत १३ सामन्यांतून ४०७ धावा फटकावल्या आहेत.

yashasvi jaiswal and rinku singh
Mumbai Cyber Crime : सायबर चोराकडून एकाची फसवणूक

रिंकूची फलंदाजी जेवढी आपण पाहातो तेवढा तो अधिक आत्मविश्वास असलेला फलंदाज जाणवतो. त्याच्याकडे कमालीची विचारशक्ती आहे. दडपण असताना तो अजिबात डगमगत नाही. रिंकू आणि यशस्वी दोघेही कठीण परिस्थितीतून पुढे आले आहेत, असे शास्त्री यांनी सांगितले.

रिंकू आणि यशस्वीसाठी क्रिकेटमधला हा प्रवास अडथळ्यांचा होता. त्यांच्यासाठी कोणतीच गोष्ट सोपी नव्हती. त्यामुळे सर्वोत्तम कामगिरी करण्याची त्यांची भूक पदोपदी जाणवते आणि खेळाविषयी असलेली त्यांची तळमळ प्रभावीत करणारी असते, असेही शास्त्री म्हणाले.

yashasvi jaiswal and rinku singh
Mumbai : गृहनिर्माण प्रकल्पांच्या नोंदणीतील फसवणूक टळणार; महारेराकडून नियमावली जारी

रवी शास्त्री यांनी डावखुरे फलंदाज तिलक वर्मा, बी साई सुदर्शन आणि यष्टीरक्षक फलंदाज जितेश शर्मा या खेळाडूंचाही आवर्जून उल्लेख केला. यंदाच्या आयपीएलमध्ये त्यांनीही आपला ठसा उमटवला आहे. जितेश शर्मा यष्टीरक्षक फलंदाज असल्याचा फायदा भारतीय संघाला भविष्यात होऊ शकतो, असेही शास्त्री यांनी सुचवले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com