esakal | आयपीएल क्रिकेट मॅचवर सट्टा; फलटणला 5 जणांवर गुन्हा, मोबाईलसह कॅल्क्युलेटर-चिठ्ठ्या जप्त I IPL Cricket
sakal

बोलून बातमी शोधा

IPL Cricket

फलटण शहरातील बाबासाहेब मंदिरामागे पोलिसांनी छापा टाकला.

आयपीएल क्रिकेट मॅचवर सट्टा; फलटणला 5 जणांवर गुन्हा

sakal_logo
By
किरण बोळे

फलटण शहर (सातारा) : गांधी जयंतीदिनी (Mahatma Gandhi Jayanti 2021) मोबाईलद्वारे आयपीएल क्रिकेट मॅचवर (IPL Cricket Match) मोबाईलद्वारे सट्टा व कल्याण मटका (Kalyan Matka) घेतल्याप्रकरणी शहरातील पाच जणांविरुध्द फलटण शहर पोलिस ठाण्यात (Phaltan City Police Station) गुन्हा नोंद झाला आहे. यावेळी पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात ९५ हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.

याबाबत फलटण शहर पोलिस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी, की ता. 2 ऑक्टोबर रोजी बाबासाहेब मंदिरामागे पोलिसांनी छापा टाकला. या वेळी केवल हरिश्‍चंद्र वाघमारे (रा. मारवाड पेठ, फलटण), राकेश राजेंद्र तेली (रा. तेली गल्ली, फलटण), अमर अनिल पिसाळ (रा. बुधवार पेठ, फलटण), किशोर आनंदा घोलप व आदित्य अशोक शिंदे हे आयपीएल २०२१ क्रिकेट मॅचवर मोबाईलद्वारे ग्राहकांची नावे व भाव घेऊन पैशाचे हार-जीत वर जुगार व सट्टा खेळताना तसेच कल्याणचा मटका लोकांकडून रोख व मोबाईलद्वारे पैसे स्वीकारत असताना मिळून आले.

हेही वाचा: Video : 'जम्मू एक्स्प्रेस' उमरान मलिनं टाकला 'सुपर फास्ट' चेंडू

या वेळी पोलिसांनी पाच हजार रुपयांची रोख रक्कम, ९० हजार रुपये किंमतीचे चार अँड्रॉईड मोबाईल, पेन, कॅल्क्युलेटर, चिठ्ठ्या व एक सॅक असा एकूण ९५ हजार ६६५ रुपयांचा ऐवज जप्त केला. याबाबतची फिर्याद पोलिस कॉन्स्टेबल सुजित मेंगावडे यांनी दाखल केली आहे. ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक अजय कुमार बन्‍सल, अतिरिक्त पोलिस अधीक्षक अजित बोराडे, पोलिस उपअधीक्षक तानाजी बरडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक भारत किंद्रे, पोलिस निरीक्षक किशोर धुमाळ, सहायक पोलिस निरीक्षक एस. के. राऊळ व पोलिस कर्मचाऱ्यांनी केली.

loading image
go to top