esakal | Sakal - Read Latest Breaking Marathi News from Maharashtra India & Around the World
sakal

बोलून बातमी शोधा

Umran Malik

Video : 'जम्मू एक्स्प्रेस' उमराननं टाकला 'सुपर फास्ट' चेंडू

sakal_logo
By
सुशांत जाधव

Umran Malik Fastest deliveries : सनरायझर्स हैदराबादने दुबईच्या मैदानात रंगलेल्या कोलकाता नाईट रायडर्स विरुद्धच्या सामन्यात जम्मू काश्मीरच्या जलदगती गोलंदाजाला संघात स्थान दिले. उमरान मलिकने आपल्या पदार्पणाच्या सामन्यात हंगामातील सर्वाधिक जलद चेंडू फेकण्याचा विक्रम आपल्या नावे नोंदवला. कोलकाताच्या डावातील चौथ्या षटकातील तिसरा चेंडू त्याने 150kph वेगाने फेकला. यंदाच्या हंगामात भारतीय गोलंदाजाने फेकलेला हा सर्वात जलद चेंडू ठरला.

यापूर्वी मोहम्मद सिराजने 147.68kph वेगाने चेंडू फेकला होता. या यादीत हैदराबादकडून खेळणारा खलदी अहमद तिसऱ्या स्थानावर असून त्याने 147.38kph वेगाने चेंडू फेकला होता. या यादीत पुन्हा एकदा चौथ्या क्रमांकावर उमरान मलिकचेच नाव आहे. आपल्या पहिल्या षटकात त्याने 146.84kph वेगाने चेंडू फेकला होता. सातत्याने तो 140.00kph + वेगाने चेंडू टाकताना दिसले. त्याला विकेट किती मिळाल्या आणि त्याने धावा किती खर्च केल्या यापेक्षा त्याच्या वेगाची चर्चा होणार हे निश्चित.

हेही वाचा: Video युजीच्या 'त्या' ओव्हरमध्ये मॅच फिरली!

परदेशी गोलंदाजांमध्ये कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळणाऱ्या लॉकी फर्ग्युसनने यंदाच्या हंगामात सर्वात वेगवान चेंडू टाकला होता. त्याने 152.75kph आणि 152.74 kph वेगाने चेंडू फेकला आहे. त्याच्यापाठोपाठ या यादीत दिल्ली कॅपिटल्सचा जलदगती गोलंदाज नोर्तजेचा नंबर लागतो. त्याने यंदाच्या हंगामात 151.71kph वेगाने चेंडू फेकला होता.

हेही वाचा: PBKS साठी सोळावं षटक ठरलं धोक्याच; RCB प्ले ऑफमध्ये

आयपीएलच्या आतापर्यंतच्या इतिहासात सर्वाधिक वेगवान चेंडू टाकण्याचा विक्रम हा कगिसो रबाडाच्या नावे आहे. त्याने 154.23kph, 153.91kph आणि 153.50 kph या वेगाने चेंडू फेकले आहेत.

loading image
go to top