Aakash Chopra Questions Rishabh Pant’s Mental Stability : इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) 2025 च्या यंदाच्या हंगामात लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार ऋषभ पंत याचे प्रदर्शन अत्यंत निराशाजनक राहिले आहे. रविवारी मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यातही तो चुकीचा फटका खेळण्याच्या नादात लवकर बाद झाला. कर्णधार म्हणूनही त्याला विशेष कामगिरी करता आली नाही. पंतच्या खराब प्रदर्शनामुळे क्रीडा वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.