भारतीय क्रिकेट संघाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरील खराब कामगिरीनंतर बीसीसीआयने कारवाईला सुरुवात केली. भारताला मागील वर्षभरात कसोटी क्रिकेटमध्ये काही खास कामगिरी करता आलेली नाही. न्यूझीलंडविरुद्ध घरच्या मैदानावर ते ०-३ असे हरले, तर बॉर्डर गावस्कर ट्रॉफी १-३ अशी गमावली. त्यामुळे बीसीसीआयने सहाय्यक प्रशिक्षक अभिषेक नायर ( Abhishek Nayar ) याची हकालपट्टी केल्याचे वृत्त काही दिवसांपूर्वी समोर आले होते. बीसीसीआयने याबाबत अधिकृत काहीच सांगितले नव्हते. पण, आज इंडियन प्रीमिअऱ लीग २०२५ मधील फ्रँचायझीने त्याला आपल्या ताफ्यात घेतल्याची घोषणा केली.