SRH vs LSG : खेळपट्टी संथ होती की केएलची खेळी? हेडनं जुन्या जखमेवरची खपली काढली

Abhishek Sharma Travis Head Power Hitting KL Rahul Slow Inning SRH Defeat LSG IPL 2024
Abhishek Sharma Travis Head Power Hitting KL Rahul Slow Inning SRH Defeat LSG IPL 2024 esakal

Abhishek Sharma Travis Head Power Hitting KL Rahul Slow Inning SRH Defeat LSG IPL 2024 :

आयपीएलच्या 17 व्या हंगामात प्ले ऑफ गाठण्यासाठी लखनौ सुपर जायंट्स अन् सनराईजर्स हैदराबाद यांच्यातील सामना महत्वाचा होता. जो संघ सामना जिंकणार तो प्ले ऑफच्या जवळ पोहचणार होता. लखनौ सामना आपल्या होम ग्राऊंडवर खेळत असल्यानं त्यांचच पारडं जड होतं. मात्र केएलच्या लखनौचं हैदराबादविरूद्धचं ट्रॅक रेकॉर्ड एकमद खतरनाक होतं. त्यांनी हैदराबादविरूद्ध एकही सामना हरला नव्हता. त्यात टॉस केएलच्या बाजूनं गेला अन् सर्वांना वाटलं लखनौ अर्धी लढाई जिंकली.

मात्र केएलचा सामना पॅट कमिन्सच्या कॅप्टन्सीखाली खेळणाऱ्या हैदराबादशी होत होता. पॉवर प्लेमध्ये लखनौनं संथ सुरूवात केली. त्यात हैदराबादच्या भुवीनं दोन धक्के देत केएलसमोर आव्हानांचा डोंगर उभा केला. संथ खेळणारा केएल राहुल कसा बसा रन रेट वाढवण्यासाठी झटत होता. पिच देखील संथ वाटत होती. त्यात हैदराबादचे वर्ल्ड क्लास बॉलर लखनौला एका एका रनसाठी झुंजायला लावत होते.

Abhishek Sharma Travis Head Power Hitting KL Rahul Slow Inning SRH Defeat LSG IPL 2024
SRH vs LSG : फटके पडले केएलला अन् वेदना झाल्या पांड्याला! विक्रमांच्या पावसात हैदराबादची प्ले ऑफच्या दिशने कूच

पॉवर प्ले संपला अन् नवव्या ओव्हरमध्ये केएल 33 बॉल खेळून 29 रन्सवर बाद झाला. त्यानंतर आलेल्या निकोलस पूरन अन् आयुष बदोनीनं त्याच पिचवर तुफान हाणामारी करत केएल राहुलचाच पिक्चर पाडला. 11.2 ओव्हरमध्ये 66 रन्स करत कासवाच्या गतीनं सुरू असलेली लखनौची इनिंग फास्ट ट्रॅक झाली. निकोलस पूरन अन् आयुष बदोनीनं पुढच्या जवळपास 8.4 ओव्हरमध्ये 99 धावा चोपल्या. पूरननं 26 बॉलमध्ये 48 रन्स केल्या. तर बदोनी 30 बॉलमध्ये 55 रन्स करून नाबाद राहिला. दोघांचही स्ट्राईक रेट 180 च्या वर होतं. यामुळं पिच स्लो होतं की केएलची इनिंग अशी शंका येऊ लागली.

या शंकेला अजून बळ मिळालं ते हैदराबादनं पॉवर प्लेमध्ये केलेल्या बॅटिंगमुळं! हैदराबाद पॉवर प्लेमध्येच सामन्याचा नूर सेट करतं. आजच्या सामन्यात देखील तेच केलं. अभिषेक शर्मा अन् ट्रॅव्हिस हेड या डावखुऱ्या जोडीनं लखनौच्या बॉलर्सची चौफेर धुलाई केली. त्यांनी पॉवर प्लेमध्ये 107 रन्स ठोकत आम्हाला सामना संपवण्याची घाई असल्याचं दाखवून दिलं. दोन्ही सलामीवीरांनी 16 बॉलमध्ये आपलं अर्धशतक पूर्ण करत एक वेगळ्याच स्तरावरचं कॉम्पिटिशन सेट केलं.

Abhishek Sharma Travis Head Power Hitting KL Rahul Slow Inning SRH Defeat LSG IPL 2024
Country Cricket : भांडण बीसीसीआय अन् पीसीबीचं; तिकडं इंग्लंड क्रिकेट बोर्डाचे ह्रदयाचे ठोके का वाढले?

दुसरीकडं लखनौच्या कॅप्टनकडं तोंडात बोटं घालण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. हेड तर ब्लू जर्सी पाहिल्यावर चवताळतो. केएल अन् हेडचं एक अजब इक्वेशन आहे. ज्यावेळी केएल स्लो इनिंग खेळतो त्यावेळी केएलला खोटं पाडण्यासाठी हेड तुफान वेगानं खेळी करतो. वनडे वर्ल्डकप फायनलमध्येही तसंच घडलं होतं. अन् आजच्या सामन्यात देखील तोच कित्ता पुढे गिरवला गेला. हेडनं 30 बॉलमध्ये नाबाद 89 धावा ठोकल्या. अभिषेक शर्मानं 28 बॉलमध्ये 75 धावा करत सामना 9.4 षटकातच हैदराबादच्या खिशात टाकला.

सामना झाल्यावर भंजाळलेला केएल प्रतिक्रियाही तशीच दिली, हैदराबादची हाणामारी टीव्हीवर पाहत होतो. आज डोळ्यानं पाहिली. खरंच वाटना एवढा मार खाल्लाय! या पोरांनी पिच पाहिलं नाही बॉल पाहिला नाही पहिल्या बॉलपासून हाण तू बडीव!

(IPL 2024 Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com