Virat Kohli emotional statement after winning IPL
Virat Kohli emotional statement after winning IPL esakal

आमच्या कारकिर्दीची 'End Date' असते...! विराट कोहलीचं निवृत्तीबाबत मोठं विधान; IPL जिंकल्यानंतर म्हणाला...

Virat Kohli emotional statement after winning IPL : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने अखेर आयपीएल जेतेपदाला गवसणी घातली. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या फायनलमध्ये त्यांनी पंजाब किंग्सचा पराभव केला आणि जेतेपद निश्चित होताच विराट कोहली ढसाढसा रडताना दिसला. आयपीएल २०२५ ट्रॉफी उंचावल्यानंतर विराटने निवृत्तीबाबत मोठं विधान केलं.
Published on

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या इंडियन प्रीमिअर लीग २०२५ जेतेपदावर शिक्कामोर्तब होताच विराट कोहली गुडघ्यावर मैदानावर बसला, त्याने डोकं मैदानावर ठेवले अन् ढसाढसा रडला. RCB चे सर्व खेळाडूंनी त्याच्याकडे धाव घेतली, त्याला मिठी मारली.. १८ वर्ष विराटने या क्षणाची आतुरतेनं वाट पाहिली होती आणि १८ क्रमांकाची जर्सी घालणाऱ्या विराटला आयपीएलच्या १८ व्या वर्षीच जेतेपद मिळणं. हा योगायोग अनेकांना हवा होता आणि तेच घडलं. ३६ वर्षीय विराटने अखेर आयपीएल ट्रॉफी हातात घेतली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com