Virat Kohli Video : किंग कोहलीच्या एका कृतीने हार्दिकचा विरोध मावळला; रोहितला जमलं नाही विराटनं करून दाखवलं

Virat Kohli Request Fan Stopped Hooting Against Hardik Pandya
Virat Kohli Request Fan Stopped Hooting Against Hardik Pandya esakal

Virat Kohli Video MI vs RCB IPL 2024 : मुंबईचा राजा रोहित शर्मा...विराट कोहलीही प्रेक्षकांचा लाडका...अन् हार्दिकला होणारा विरोध त्वरित मावळला... वानखेडे स्टेडियमवरचे हे गुरुवारचे चित्र मुंबई इंडियन्स या आपल्या संघाने मिळवलेल्या विजयाएवढेच हार्दिक पंड्यासाठी आनंददायी ठरले.

मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार झाल्यापासून हार्दिकला अगोदर सोशल मीडियावर आणि आयपीएल सुरू झाल्यानंतर केवळ मुंबईतच नव्हे तर अहमदाबाद आणि हैदराबादमध्ये प्रेक्षकांच्या फार मोठ्या विरोधाचा सामना करावा लागत आहे, पण गुरुवारी बंगळूर संघाविरुद्धच्या सामन्यात विराट कोहलीने केलेल्या एका कृतीमुळे वातावरण बदलले.

Virat Kohli Request Fan Stopped Hooting Against Hardik Pandya
LSG vs DC Live Score Update : कुलदीप यादवचा धडाका, लखनौची मधली फळी ढेपाळली

वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात हार्दिक पंड्या सायंकाळी नाणेफेकीसाठी आला तेव्हापासून रोहित...रोहित...असे म्हणत हार्दिकला असलेला विरोध प्रेक्षकांनी कायम ठेवला होता, पण मुंबई इंडियन्सचा संघ फलंदाजी सुरू असताना रोहित शर्मा बाद झाल्यावर हार्दिक फलंदाजीस आला त्यावेळी त्याची हुर्यो उडवण्यास सुरुवात झाली होती; परंतु सीमारेषेजवळ क्षेत्ररक्षण करत असलेल्या विराटने प्रेक्षकांकडे पाहून... असे करू नका. तोसुद्धा भारतीय संघाचा खेळाडू आहे, त्याचा सन्मान ठेवा, लहान मुलांप्रमाणे तुम्ही वागू नका...अशी हातवारे करून कृती केली आणि क्षणार्धात फरक पडला. हुर्यो उडवणारे तेच प्रेक्षक हार्दिक...हार्दिक...असे म्हणू लागले.

याच हार्दिकने मग सूर्यकुमारसह निर्णायक भागीदारी करून मुंबई संघाचा विजय निश्चित केला, तेथेच बंगळूरचा पराभव निश्चित झाला. आयपीएलमध्ये प्रतिस्पर्धी संघाचा कर्णधार असला तरी भारतीय संघातील साथीदार म्हणून हार्दिकच्या पाठीशी उभे राहाणाऱ्या विराटच्या कृतीचे सर्वत्र कौतुक करण्यात आले.

Virat Kohli Request Fan Stopped Hooting Against Hardik Pandya
Rohit Sharma Retirement : आयुष्य कुठं घेऊन जाईल... रोहित शर्मा निवृत्तीबाबत पहिल्यांदाच एवढं काही बोलला

रविवारी काय होणार?

विराटने सुचवल्यामुळे वानखेडे स्टेडियमवर गुरुवारी उपस्थित असलेल्या मुंबईकर प्रेक्षकांनी हार्दिकची हुर्यो उडवणे थांबवले होते; परंतु हेच चित्र या पुढे कायम रहाणार का, हा प्रश्न आहे. रविवारी वानखेडे स्टेडियमवर मुंबईचा सामना महेंद्र सिंग धोनीच्या चेन्नई संघाविरुद्ध आहे. विराटएवढेच धोनीचेही समर्थक मुंबईतही आहेत. धोनीने समजूत काढली तर तेसुद्धा हार्दिकच्या पाठीशी उभे राहू शकतील.

(IPL Marathi News)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com