Ahmedabad Weather LIVE Updates: इंडियन प्रीमिअर लीग २०२५ मध्ये आज नवा विजेता ठरणार आहे, परंतु या सामन्यावर वरुण राजा व्यत्यय आणणार हे चित्र आतापासूनच दिसू लागले आहे. कोलकाता येथे पावसाचा अंदाज व्यक्त केला गेला असल्यामुळे आयपीएल फायनल अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियम येथे हलवण्यात आली. क्वालिफायर २ च्या लढतीतही पावसाने खोडा घातला होता आणि आजही तशीच शक्यता आहे. RCB vs PBKS सामना सायंकाळी ७.३० वाजता सुरू होणार आहे आणि आता सायंकाळचे ४:३० वाजल्यापासून पावसाची सुरुवात झाली आहे. त्यामुळे दोन्ही संघांच्या चाहत्यांचे टेंश वाढले आहे. विशेषतः RCB च्या चाहत्यांचे...