जडेजा कॅप्टन्सीसाठी सीएसके सोडण्याची होती शक्यता : आकाश चोप्रा

Akash Chopra says Ravindra Jadeja might think Leave CSK
Akash Chopra says Ravindra Jadeja might think Leave CSK esakal

चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) आयपीएलचा 15 वा हंगाम सुरू होण्यापूर्वी दोन दिवस आधी आपला कर्णधार (Captaincy) बदलला. महेंद्रसिंह धोनीने कॅप्टन्सी रविंद्र जडेजाकडे (Ravindra Jadeja) सोपवली. हंगामाच्या तोंडावर हा निर्णय घेण्यात आल्याने सीएसकेच्या चाहत्यांना चांगलाच धक्का बसला. दरम्यान, भारताचा माजी फलंदाज आणि समालोचक आकाश चोप्राने (Akash Chopra) एक खळबळजनक वक्तव्य केले आहे. चोप्रा म्हणतो की रविंद्र जडेजा कॅप्टन्सीसाठी चेन्नई सुपर किंग्जला सोडचिठ्ठी देण्याच्या तयारीत असण्याची शक्यता होती.

Akash Chopra says Ravindra Jadeja might think Leave CSK
VIDEO: 'आवा दे' म्हणत गुजरात टायटन्सने केले ANTHEM रिलीज

आकाश चोप्राने आपल्या यूट्यूब चॅनेलद्वाले संवाद साधताना म्हणाला की, 'जर रविंद्र जडेजा चेन्नई सुपर किंग्जची साथ सोडण्यास तयार झाला असता तर तो गुजरात टायटन्सचा (Gujarat Titans) कर्णधार झाला असता. मात्र रविंद्र जडेजाने चेन्नई सुपर किंग्जसोबतच राहण्याचा निर्णय घेतला. याचे बक्षीस त्याला मिळालेच महेंद्रसिंह धोनीने कॅप्टन्सी सोडल्यानंतर संघाचे त्याच्याकडे कर्णधरापद सोपवले आहे.'

Akash Chopra says Ravindra Jadeja might think Leave CSK
घरकाम करणाऱ्या, चहा विकणाऱ्या पोरांचे आयुष्य बदलणारी आयपीएल

चेन्नई सुपर किग्जने कर्णधारपद जडेजाकडे सोपवल्यानंतर त्याने प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला, ''मला मोठी जबाबदारी मिळाली आहे. धोनीने सीएसकेसाठी जे केले त्याची बरोबरी होऊ शकत नाही. मला घाबरण्याची गरज नाही. एमएस धोनी अजूनही संघासोबत आहे. मी प्रत्येक गोष्टीसाठी त्याच्याकडे जाईन. माझ्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरे माही भाईकडे मिळतील. तो माझ्या सोबत आहे त्यामुळे मला कोणत्या अडचणींचा सामना करावा लागणार नाही. तो सीएसकेसाठी एक मोठा वारसा सोडून गेला आहे.'

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com