MS Dhoni: 'चाहत्यांसाठी आधी धोनी अन् मग CSK, जडेजाही वैतागतो', चेन्नईच्याच माजी खेळाडूचा मोठा खुलासा

Ambati Rayudu on CSK fans: चेन्नई सुपर किंग्स संघाच्या चाहत्यांच्या धोनीप्रेमाबाबत माजी क्रिकेटपटूने मोठे भाष्य केले आहै.
CSK
CSK Sakal

Ambati Rayudu on CSK Fans: चेन्नई सुपर किंग्स संघ लोकप्रिय संघांमध्ये गणला जातो. या संघाचा भारतभरात चाहतावर्ग दिसून येतो. सध्या चालू असलेल्या इंडियन प्रीमियर लीग 2024 स्पर्धेतही चेन्नईला मोठा पाठिंबा मिळत असल्याचे दिसले आहे.

यामागे एक मोठे कारण एमएस धोनी आहे. धोनी 2008 पासून या संघाशी जोडलेला असून त्याच्या नेतृत्वात या संघाने 5 वेळ आयपीएलचे विजेतेपदही जिंकले आहे.

दरम्यान, यंदा धोनी अखेरचा आयपीएल हंगाम खेळत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे त्याला आयपीएल 2024 मध्ये मोठा पाठिंबा मिळताना दिसत आहे. याचबद्दल आता धोनीचा माजी संघसहकारी अंबाती रायुडूने भाष्य केले आहे. त्याने म्हटले आहे की चेन्नई सुपर किंग्सचे चाहते आधी धोनीचे चाहते आहेत. ज्यामुळे कधीकधी जडेजाही वैतागतो.

CSK
Pakistan Cricket Team : जिंकलेत आयर्लंडविरूद्ध अन् म्हणे पाकिस्तान जगातील सर्वोत्तम संघ... PCB च्या नक्वींनी कळसच गाठला

त्याने स्टार स्पोर्ट्सशी बोलताना म्हटले आहे की 'जेव्हा तुम्ही षटकार आणि चौकार मारता, तेव्हा प्रेक्षक शांत असतात. मी आणि जडेजाने गेल्या काही वर्षात हे अनुभवलं आहे. माझा विश्वास आहे की चेन्नई सुपर किंग्सचे चाहते आधी धोनीचे चाहते आहेत आणि मग चेन्नई संघाचे. अगदी जडेजाही यामुळे वैतागतो, पण तो काहीही करू शकत नाही.'

रायुडू 2018 ते 2023 पर्यंत चेन्नई संघाचा महत्त्वाचा भाग राहिला होता. त्यामुळे त्याला या संघाकडून खेळण्याचा चांगला अनुभव देखील आहे.

CSK
Neeraj Chopra: मायदेशातील स्पर्धेतही नीरजचा डंका! तीन वर्षांनी पुनरागमन करत फेडरेशन कपमध्ये जिंकले सुवर्णपदक

दरम्यान, धोनी चेन्नईकडून सर्वाधिक सामने खेळणारा खेळाडूही आहे. तसेच या संघाशी पहिल्या हंगामापासून जोडलेला असल्याने त्याचे या संघाशी खास नाते तयार झाले आहे.

दरम्यान, आयपीएल 2024 पूर्वी धोनी चेन्नई संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी युवा ऋतुराज गायकवाडच्या खांद्यावर सोपवली आहे. त्यामुळे यंदा ऋतुराज चेन्नईने नेतृत्व करताना दिसत आहे.

आयपीएल 2024 मध्ये चेन्नईने आत्तापर्यंत 13 सामन्यांत 7 विजय मिळवले आहेत, तर 6 पराभव स्विकारले आहेत. आता 18 मे रोजी अखेरचा साखळी सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू विरुद्ध खेळायचा आहे. हा सामना प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. जर हा सामना चेन्नईने जिंकला, तर ते प्लेऑफसाठी पात्र ठरणार आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com