
इंडियन प्रीमिअर लीग २०२५ मध्ये सध्या महेंद्रसिंग धोनी आणि अंबाती रायुडू हे चेन्नई सुपर किंग्संचे आजी-माजी खेळाडू चर्चेत आहेत. ४३ वर्षीय धोनीच्या फलंदाजीच्या क्रमावरून टीका होत असताना अंबाती त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिलेला दिसतोय. धोनीने आता आयपीएलमधून निवृत्ती घ्यायला हरकत नाही, अशी चर्चा नेटिझन्स करत असताना अंबाती अजूनही माहीचे कौतुक करताना थांबता थांबत नाहीए. त्यावरून नेटिझन्सने CSK च्या माजी खेळाडूला ट्रोल केले आणि अंबातीनेही आज त्यांना चांगलेच उत्तर दिले.