
Video : आंद्रे रसलचा भन्नाट टॉवेल डान्स; प्रेक्षकांना सलमान खानची आठवण
IPL 2022 : राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्यात आयपीएलचा 47 सामना खेळल्या गेला. नाणेफेक जिंकून राजस्थान रॉयल्सने प्रथम फलंदाजी केली. सामन्यादरम्यान कोलकाताचा दिग्गज आंद्रे रसेलकडून एक मनोरंजक दृश्य पहायला मिळाले. सामन्यादरम्यान रसेल हातात टॉवेल घेऊन सलमान खानच्या भूमिकेत डान्स करत चाहत्यांना मनोरंजन करताना दिसला. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. (Andre Russell Dancing Video Viral)
हेही वाचा: VIDEO: सुपरमॅन स्टाईल मध्ये पाकिस्तानच्या मोहम्मद रिझवानचा झेल
राजस्थानच्या डावात आंद्रे रसेल सीमेजवळ क्षेत्ररक्षण करत होता. यावेळी रसेल डान्स करताना दिसला. त्यामुळे चाहत्यांचे भरपूर मनोरंजन झाले. रसेलच्या डान्सचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. सामन्याबद्दल बोलायचं झालं तर प्रथम फलंदाजी करताना राजस्थान रॉयल्सने 20 षटकांत 5 गडी बाद 152 धावा केल्या. राजस्थानकडून संजू सॅमसनने 54 धावांची खेळी खेळली. तर शिमरॉन हेटमायरने फलंदाजी करताना नाबाद 27 धावा केल्या.
हेही वाचा: Oops! रन वाचवायला गेला पण पँट सुटली; IPL सामन्यातला VIDEO व्हायरल
प्रत्युत्तर कोलकाता नाईट रायडर्सची सुरुवात चांगली झाली नाही. अॅरॉन फिंच 4 आणि बाबा इंद्रजीत 15 धावा करून बाद झाले. यानंतर धावा काढण्याची जबाबदारी कर्णधार श्रेयस अय्यर आणि नितीश राणा यांनी सांभाळली. अय्यरला वैयक्तिक ३४ धावांवर बोल्टने पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. यानंतर फलंदाजीला आलेल्या रिंकू सिंगने नितीश राणाला साथ दिली आणि चौथ्या विकेटसाठी दोघांमध्ये अर्धशतकी भागीदारी झाली. राणाने 48 आणि रिंकूने 42 धावांची नाबाद खेळी खेळत संघाला विजय मिळवून दिला. नितीश राणाने शेवटच्या षटकातील पहिल्या चेंडूवर विजयी षटकार ठोकला.
Web Title: Andre Russell Dancing Video Ground Ipl 2022 Kkr Vs Rr Viral Video
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..