Arjun Tendulkar IPL Debut : पदार्पणाच्या सामन्यातच अर्जुन तेंडुलकरने इतिहास रचला; इरफान पठाणने केले ट्विट

Arjun Tendulkar IPL Debut
Arjun Tendulkar IPL Debut esakal
Updated on

Arjun Tendulkar IPL Debut : आयपीएल 2023 मधील 22 वा सामना आज मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात खेळला जात आहे. या सामन्यात एक मोठी घटना घडली. भारताचा मास्टर ब्लास्टर माजी कर्णधार सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरने मुंबई इंडियन्सकडून आयपीएल पदार्पण केले. अखेर 2 वर्षे बेंचवर बसून राहिल्यानंतर अर्जुन तेंडुलकरला आयपीएलमध्ये आपली प्रतिभा सिद्ध करण्याची संधी मिळाली.

Arjun Tendulkar IPL Debut
IPL 2023 : मुंबई इंडियन्सला मिळाला नवीन 'कर्णधार'! रोहित शर्मा बाहेर

आजच्या केकेआर विरूद्धच्या सामन्यात मुंबई इंडियन्सने अनपेक्षित असे निर्णय घेतले. नाणेफेकीसाठी रोहित शर्मा न येता थेट सूर्यकुमार यादवच नाणेफेक करण्यासाठी आला. त्यावेळी रोहित शर्माच्या पोटात गडबड असल्याने तो आजच्या सामन्यात कर्णधार म्हणून उतरणार नाही असे कळले. यानंतर ज्यावेळी सूर्यकुमार यादवने नाणेफेक जिंकली आणि आपली प्लेईंग 11 सांगितली त्यावेळी सर्व सचिन आणि मुंबई इंडियन्स प्रेमींना सुखद धक्का बसला.

सचिनचा मुलगा अर्जुन तेंडुलकरने आज केकेआरविरूद्ध आयपीएल पदार्पण केले. अर्जुन तेंडुलकर 2021 पासून मुंबई इंडियन्ससोबत आहे. मात्र त्याला आयपीएल पदार्पण करण्याची संधी मिळाली नव्हती. अखेर आज ती संधी मिळाली. विशेष म्हणजे पदार्पणाच्या सामन्यातच अर्जुन तेंडुलकरने इतिहास रचला. आयपीएल इतिहासात एक बाप - बेट्याची जोडी एकाच फ्रेंचायजीकडून खेळण्याची ही पहिलीच घटना ठरली.

Arjun Tendulkar IPL Debut
MI vs KKR : इशान किशनचे अर्धशतक; मुंबई इंडियन्सचा 4 विकेट्स राखून विजय

अर्जुन तेंडुलकर आयपीएल पदार्पण करणार म्हटल्यावर भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाणने ट्विट केले. तो आपल्या ट्विटमध्ये म्हणतो की, '10 वर्षाच्या अंतरात वडील आणि मुलगा एकाच फ्रेंचायजीकडून खेळले. ही आयपीएलमधील ऐतिहासिक घटना ठरली. अर्जुन तेंडुलकर तुला खूप खूप शुभेच्छा!'

मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्स विरूद्धचा आपला सामना जिंकून हंगामातील आपला पहिला विजय मिळवला. तर दुसऱ्या बाजूला कोलकात्याला गेल्या सामन्यात सनराईजर्स हैदराबादकडून 23 धावांनी पराभव सहन करावा लागला होता. आज वानखेडेवर हे दोन्ही संघ भिडत आहेत.

(Sports Latets News)

हेही वाचा : What is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com