esakal | IPL 2021: अश्विनच्या 'या' चुकीमुळे दिल्लीचं फायनलचं स्वप्न भंगलं - गावसकर
sakal

बोलून बातमी शोधा

अश्विनच्या 'या' चुकीमुळे दिल्लीचं फायनलचं स्वप्न भंगलं - गावसकर

६ चेंडूत ७ धावांची गरज असताना अश्विनला दिलं षटक

अश्विनच्या 'या' चुकीमुळे दिल्लीचं फायनलचं स्वप्न भंगलं - गावसकर

sakal_logo
By
विराज भागवत

IPL 2021 Qualifier 2 DC vs KKR: दिल्लीविरूद्धच्या अटीतटीच्या सामन्यात कोलकाता संघाने थरारक विजय मिळवला. दिल्लीने प्रथम फलंदाजी करताना शिखर धवनच्या ३६ धावांच्या जोरावर २० षटकात १३५ धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना कोलकाताचे सलामीवीर व्यंकटेश अय्यर (५१) आणि शुबमन गिल (४६) यांच्या जोडीने संघाला दमदार सलामी मिळवून दिली. त्यानंतर शेवटच्या टप्प्यात सामन्यात थरार निर्माण झाला असताना राहुल त्रिपाठीने निर्णायक षटकार लगावत संघाला विजय मिळवून दिला. या सामन्यात रविचंद्रन अश्विनची एक चूक संघाला महागात पडली.

हेही वाचा: IPL 2021: KKR ने केली 'दिल्ली' काबीज; CSK शी खेळणार फायनल!

रविचंद्रन अश्विन हा प्रचंड अनुभवी गोलंदाज आहे. या गोलंदाजाने आतापर्यंत अनेक बड्या खेळाडूंना तंबूत पाठवलं आहे. कोलकाताविरूद्धच्या सामन्यात ६ चेंडूत ७ धावांची गरज असताना अश्विनला गोलंदाजी देण्यात आली होती. अश्विनने पहिल्या चेंडूवर राहुल त्रिपाठीला १ धावा दिली. त्यानंतरचा चेंडू निर्धाव टाकला आणि पुढील दोन चेंडूवर दोन गडी बाद केले. पण त्यानंतर अश्विनने एक चूक केली. दडपणात कसं खेळावं याचा अंदाज असलेल्या राहुल त्रिपाठीला त्याने आखूड टप्प्याचा वेगवान चेंडू टाकायचा प्रयत्न केला. त्या चेंडूवरच अश्विन चुकला आणि राहुल त्रिपाठीने थेट षटकार खेचत संघाला विजय मिळवून दिला.

असं रंगलं शेवटचं षटक...

गावसकर म्हणाले, "अश्विन खूप हुशार गोलंदाज आहे. कोणत्या फलंदाजाला कसा चेंडू टाकायचा हे त्याला नीट माहिती असतं. सुनील नारायण पुढे येणार त्याला माहिती होतं, त्यामुळे त्याने थोडासा ऑफ दिशेला चेंडू टाकला. राहुल त्रिपाठीही पुढे येईल असा अश्विनचा अंदाज होता पण त्रिपाठी जागेवर उभा राहून खेळला आणि त्यामुळेच अश्विनचा अंदाज चुकला."

दरम्यान, कोलकाताने या विजयासह आपली फायनलमधील जागा निश्चित केली. आता KKR चा संघ IPL विजेतेपदासाठी CSKशी भिडणार आहे.

loading image
go to top