

Ravichandran Ashwin Criticizes CSK Management
esakal
इंडियन प्रीमियर लीग २०२६ (IPL) स्पर्धेत शनिवारी दिवसाचा दुसरा सामना चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) आणि सनराइजर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) यांच्यात झाला. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सला मोठा धक्का बसला आहे. सनराइजर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सचा खेळाडू आयुष म्हात्रे (Ayush Mhatre) या सामन्यात दुखापतग्रस्त झाला. फलंदाजी करताना आयुष वेदनेत असल्याचं स्पष्ट दिसत होतं. या सामन्यात तो इम्पॅक्ट प्लेयर म्हणून खेळायला आला होता. फलंदाजीदरम्यान आयुषची फिजिओंनी दोनदा तपासणी केली, तरीही तो मैदानात लंगडताना दिसत होता. यावरून आता भारताचा माजी फिरकीपटू रविचंद्रन आश्विन ( Ravichandran Ashwin) याने चेन्नई सुपर किंग्सच्या संघ व्यवस्थापनावर जोरदार टीका केली आहे.